पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गांधी जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता अभियानात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी


स्वच्छतेशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे नागरिकांना केले आवाहन

प्रविष्टि तिथि: 02 OCT 2024 9:39AM by PIB Mumbai

 

गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील युवकांसमवेत स्वच्छता अभियानात सहभागी झाले. मोदी यांनी नागरिकांना आज स्वच्छतेशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले, ज्यामुळे स्वच्छ भारत अभियानाला अधिक बळ  मिळेल.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

"आज, गांधी जयंतीनिमित्त, मी माझ्या युवा  मित्रांसमवेत स्वच्छतेशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी झालो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की आज तुम्ही देखील दिवसभरात अशा स्वच्छतेशी संबंधित कुठल्या ना कुठल्या  उपक्रमात सहभागी व्हा आणि त्याचबरोबर  स्वच्छ भारत अभियान बळकट करत राहा.

#10YearsOfSwachhBharat"

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2061013) आगंतुक पटल : 116
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam