संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सैन्यदल वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून सर्जन व्हाईस ऍडमिरल आरती सरीन यांची नियुक्ती

Posted On: 01 OCT 2024 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2024

 

सैन्यदल वैद्यकीय सेवेच्या ( DGAFMS) महासंचालक पदावर पहिल्या महिला सर्जन व्हाईस ऍडमिरल आरती सरीन आज 1 ऑक्टोबर 2024 रोजी नियुक्त झाल्या. DGAFMS सैन्यदलाशी संबंधित असलेली सर्व वैद्यकीय धोरणे ठरवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाला जबाबदार असते. 

याच्या आधी त्या वैद्यकीय सेवा (नौदल) च्या व  वैद्यकीय सेवा (वायुदल) च्या  महासंचालक तसेच पुण्याच्या  सैन्यदल वैद्यकीय महाविद्यालयाच्या कमांडंट पदावर कार्यरत होत्या. पुण्याच्या सैन्यदल वैद्यकीय महाविद्यालयातून रेडिओडायग्नोसिस मधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्या डिसेंबर 1985 मध्ये सैन्यदलात कमिशन झाल्या होत्या. त्याशिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयातून रेडिएशन ऑनकॉलॉजिचे तसेच अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठातून गामा नाईफ शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 

भारतीय लष्करात लेफ्टनंट ते कॅप्टन पदावर, नौदलात सर्जन लेफ्टनंट ते सर्जन व्हाईस ऍडमिरल आणि वायुदलात एअर मार्शल पदावर त्यांनी सेवा बजावली आहे, त्यामुळे भारतीय सैन्यदलाच्या तिन्ही शाखांमध्ये काम करण्याचा दुर्मिळ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. रुग्णसेवेतील त्यांच्या अत्युच्च निष्ठा व समर्पण भावाने केलेल्या कामाचा सन्मान म्हणून त्यांना 2021 मध्ये विशिष्ट सेवा पदक तसेच 2024 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित केले गेले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना कामाचे  सुरक्षित वातावरण मिळावे या अनुषंगाने नियमावली तयार करणाऱ्या राष्ट्रीय कृती दलाच्या सदस्य म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नुकतेच नियुक्त केले आहे. 

 

* * *

S.Tupe/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2060780) Visitor Counter : 77