पंतप्रधान कार्यालय
माजी आमदार सूर्यकांता व्यास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
25 SEP 2024 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2024
राजस्थानातील सूरसागर इथून आमदार राहिलेल्या सूर्यकांता व्यास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मोदी म्हणाले की त्यांनी सूरसागर, राजस्थान इथे केलेल्या लोककल्याणकारी कामांमुळे त्या कायम स्मृतीत राहतील.
आपल्या X वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले,
“राजस्थानातील सूरसागर इथल्या माजी आमदार आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्या सूर्यकांता व्यास यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाले आहे. आपल्या क्षेत्रात लोककल्याणासाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे त्या कायम आठवणीत राहतील. माझ्या जोधपूर दौऱ्यादरम्यान त्यांच्या भेटीची संधी मिळाली होती, जेव्हा त्यांनी आवर्जून विमानतळावर येऊन मला आशीर्वाद दिला. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या प्रशंसक आणि प्रियजनांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती!”
* * *
S.Kane/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2058831)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam