ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील रिपेरेबिलिटी इंडेक्स संदर्भातील ढाचा तयार करण्यासाठी केंद्रसरकार द्वारे तज्ञ समितीची स्थापना

Posted On: 24 SEP 2024 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2024

 

भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने (DoCA), उत्पादनाच्या रिपेरेबिलिटी इंडेक्स (दुरुस्ती क्षमता निर्देशांक) साठी मजबूत चौकटीची शिफारस करण्यासाठी तसेच ग्राहकांना सक्षम करण्याबरोबरच तंत्रज्ञान उद्योगातील शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी, ग्राहक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव भरत खेरा यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. रिपेअरेबिलिटी इंडेक्स विकसित करून, ग्राहकांनी खरेदी केलेल्या उत्पादनांच्या दुरुस्ती बाबतच्या माहितीमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचे आणि अधिक शाश्वत तंत्रज्ञान उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे ग्राहक व्यवहार विभागाचे उद्दिष्ट आहे.

ग्राहक हक्क आणि शाश्वततेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, 29 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील दुरुस्तीच्या अधिकारावरील राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये, उत्पादनाच्या दुरुस्तीयोग्यता निर्देशांकासाठी तसेच त्याच्या डिझाइनमधील टिकाऊपणा वाढवण्यासाठी, उत्पादनांचे मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने ढाचा  तयार करण्यावर एकमत प्रस्थापित करण्यासाठी, आणि एखाद्या वस्तूचे उत्पादन बंद झाल्यावरही त्याच्या दुरुस्ती बाबतची माहिती आणि त्याच्या स्पेअर पार्ट्सची उपलब्धता, सर्वाना शक्य व्हावी  यासाठी  उद्योग क्षेत्रातील भागधारक एकत्र आले होते.

मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी सर्वात वेगाने वाढत असून, या वस्तूंचे आयुष्य कमी असते, असे समजले जाते. दुरुस्तीयोग्यता निर्देशांकाची चौकट ग्राहकांना उत्पादनांच्या दुरुस्ती योग्यतेबाबतची आवश्यक माहिती देईल, तसेच उत्पादनाचे सुटे भाग सहज उपलब्ध झाल्यामुळे  ग्राहकांना माहितीपूर्ण खरेदीचा निर्णय घेता येईल, यावर या कार्यशाळेतील चर्चेत एकमत झाले.

रिपेरेबिलिटी इंडेक्स हा ग्राहक-केंद्रित असेल, जो ग्राहकांना उत्पादनाच्या दुरुस्ती योग्यतेवर आधारित खरेदीचा निर्णय घेण्यासाठी सक्षम करेल. त्याचबरोबर दुरुस्ती योग्यतेची पडताळणी कशी केली जाते, याचे प्रमाणीकरण करता येईल. त्यामुळे रिपेरेबिलिटी इंडेक्सिंगवर आधारित उत्पादनांची तुलना करणे ग्राहकांना सोपे जाईल, त्याद्वारे मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये माहितीपूर्ण निवडीची परिसंस्था तयार होईल.

दुरुस्तीयोग्यतेचे मूल्यमापन प्रमाणित करून, निर्देशांक एक अशी परिसंस्था तयार करेल जिथे ग्राहक उत्पादनांची सहज तुलना करू शकतील आणि उत्पादनांचा सजग वापर आणि शाश्वततेच्या मूल्यांची पूर्तता करणारे पर्याय निवडू शकतील.

अशा प्रकारे, दुरुस्ती योग्यतेमुळे केवळ दुरुस्तीचे किफायतशीर पर्याय सुनिश्चित होणार नाहीत, तर उत्पादनांच्या दुरुस्तीबाबतची माहिती सहज उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांना मिळणारे  समाधान देखील वाढेल.

 

दुरुस्ती परीसंस्थेचे प्रमुख घटक:

दुरुस्तीबाबत सर्वसमावेशक माहिती, सहज उपलब्ध सुटे भाग,किफायतशीर साधने, मॉड्यूलर डिझाइन,आर्थिक व्यवहार्यता.

या गरजा लक्षात घेऊन समितीने धोरणे/नियम/मार्गदर्शक तत्त्वे यासाठी चौकट तयार करण्याची शिफारस करणे अपेक्षित आहे, जे मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील सध्याच्या नियामक तरतुदींमध्ये दुरुस्तीयोग्यता आणि दुरुस्तीयोग्यता निर्देशांकाचा समावेश करायला समर्थन देईल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेले मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा जास्तीतजास्त पुनर्वापर करता येईल.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2058272) Visitor Counter : 43