पंतप्रधान कार्यालय
श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके यांचे पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
23 SEP 2024 12:11AM by PIB Mumbai
श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. श्रीलंकेसोबतचे बहुआयामी सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी अतिशय जास्त जवळीक ठेवून काम करण्याची अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली आहे.
एक्सवरील पोस्टमध्ये मोदी यांनी लिहिलेः
“श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल @anuradisanayake, तुमचे अभिनंदन. भारताच्या शेजाऱ्यांना प्रथम पसंती या धोरणात आणि व्हिजन सागरमध्ये श्रीलंकेचे विशेष स्थान आहे. आपल्यामधील बहुआयामी सहकार्य बळकट करण्यासाठी आणि आपल्या जनतेच्या आणि संपूर्ण प्रदेशाच्या फायद्यासाठी तुमच्यासोबत अतिशय जवळीकीने काम करण्याची माझी अपेक्षा आहे.”
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2057754)
Visitor Counter : 76
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam