कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालयाने प्रक्रिया पूर्ण होण्याच्या विविध टप्प्यांमध्ये असलेल्या 71 कॅप्टीव्ह/ व्यावसायिक कोळसा खाणींच्या प्रगतीचा आढावा घेतला
Posted On:
12 SEP 2024 2:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2024
कोळसा मंत्रालयाने विविध टप्प्यांमध्ये लिलाव करण्यात आलेल्या आणि पूर्ण होण्याच्या विविध टप्प्यांमध्ये असलेल्या कोळसा खाणींचा काल एका बैठकीदरम्यान आढावा घेतला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोळसा मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आणि नामनिर्देशित अधिकारी रुपिंदर ब्रार होत्या. यावेळी देशांतर्गत कोळसा उत्पादनाला चालना देण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेला प्राधान्य देऊन सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला.लवकरच कार्यन्वित होण्याच्या टप्प्यावर असलेल्या कोळसा खाणींना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी संबंधित खाण कंपन्यांनी आवश्यक पावले उचलावीत असे आवाहन अतिरिक्त सचिवांनी केले.
या 71 कोळसा खाणी नियामक मंजुरी मिळविण्याच्या विविध टप्प्यात आहेत. हे ब्लॉक अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या नऊ राज्यांमध्ये वितरीत करण्यात आले आहेत.
भारताच्या उर्जाक्षेत्राच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्याच्या हेतूने कोळसा खाणी कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्यासाठी मंत्रालयाच्या सक्रिय दृष्टिकोनाला हा धोरणात्मक आढावा अधोरेखित करतो. या कोळसा खाणींवर लक्ष केंद्रित करून देशांतर्गत स्त्रोतांचे उत्पादन वाढवण्याचा आणि कोळसा आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.
देशांतर्गत कोळसा उत्पादनाला चालना देऊन देशाच्या शाश्वत आर्थिक विकासाच्या मार्गाला पाठिंबा देऊन ऊर्जा सुरक्षेला अधिक मजबूत करण्यासाठी कोळसा मंत्रालय वचनबद्ध आहे.
H.Akude/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2054153)
Visitor Counter : 49