राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मानवी हक्क लघुपट स्पर्धा, प्रवेशिका 2024 स्वीकारण्याची अंतिम मुदत वाढवली आहे
भारतीय नागरिकांसाठी ऑनलाइन प्रवेश आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत खुला राहील.
प्रविष्टि तिथि:
11 SEP 2024 4:41PM by PIB Mumbai
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC), आपल्या दहाव्या वार्षिक मानवी हक्क लघुपट स्पर्धा-2024 साठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर, 2024 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी 30 ऑगस्ट ही अंतिम मुदत होती परंतु या संदर्भात देशभरातून आलेल्या विनंती पत्रांमुळे ही मुदत एका महिन्याने वाढवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या लघुपट पुरस्कार योजनेला 2015 मध्ये सुरुवात केली होती. कोणत्याही वयोगटातील लोकांच्या चित्रपट विषयक आवडीला आणि सर्जनशील प्रयत्नांना प्रोत्साहन देणे,तसेच मानवी हक्कांचा प्रचार आणि संरक्षण करणे हा या योजनेचा उद्देशआहे, यापूर्वीच्या घेतलेल्या सर्व स्पर्धांसाठी आयोगाला देशाच्या विविध भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
लघुपट इंग्रजीत किंवा कोणत्याही भारतीय भाषेत परंतु इंग्रजी उपशीर्षकांसह असावेत.लघुपटाचा कालावधी किमान 3 मिनिटे आणि कमाल 10 मिनिटांचा असावा.लघुपट हा केवळ लघुपट, माहितीपट, वास्तविक कथावस्तूचे चित्रिकरण किंवा काल्पनिक कथेवर आधारित असा असू शकतो. चित्रपट ऍनिमेशनसह कोणत्याही तांत्रिक स्वरूपात आणि चित्रपट निर्मितीच्या स्वरूपात असू शकतो.
लघुपटांची संकल्पना विविध सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय हक्कांवर आधारित असावी.हा लघुपट माहितीपट, वास्तविक कथांचे नाट्यीकरण किंवा काल्पनिक कृती शकते,ऍनिमेशनसह कोणत्याही तांत्रिक स्वरूपातील, पुढील गोष्टींच्या कक्षेत येणारी असावी :
• जीवन जगण्याचा हक्क, स्वातंत्र्य, समानता आणि सन्मानाने जगता येण्याचा हक्क
• वेठबिगार आणि बालकामगार, महिला आणि बालकांच्या हक्कांच्या विशिष्ट समस्यांचा समावेश केलेला असावा
• वृद्ध व्यक्तींच्या जीवनातील आव्हानांविषयीचे अधिकार
• अपंग व्यक्तींचे हक्क
• हाताने मैला सफाई, आरोग्यसेवेचा अधिकार
• मूलभूत स्वातंत्र्यविषयक मुद्दे
• मानवी तस्करी
• कौटुंबिक हिंसा
• पोलिसांच्या अत्याचारामुळे झालेले मानवी हक्कांचे उल्लंघन
• तुरुंगातील हिंसा आणि छळ
• सामाजिक-आर्थिक असमानता
• भटक्या विमुक्त जमातींचे हक्क
• तुरुंग सुधारणा
• शिक्षणाचा अधिकार
• पृथ्वीवरील जीवनावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणीय धोक्यांसह स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार
• काम करण्याचा अधिकार
• कायद्यासमोरील समानतेचा अधिकार
• अन्न आणि पोषण सुरक्षेचा अधिकार
• एलजीबीटीक्यूआय+ चे अधिकार
• मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या विस्थापनामुळे मानवी हक्कांचे झालेले उल्लंघन
• भारताच्या विविधतेतील मानवी हक्क आणि मूल्ये साजरी करण्याविषयी
• जीवन आणि जीवनमान सुधारण्यासाठी विकास उपक्रम इ.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एखादी व्यक्ती कितीही प्रवेशिका पाठवू शकते,यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क किंवा अट नाही. तथापि, सहभागींनी योग्यरित्या भरलेल्या प्रवेश अर्जासह प्रत्येक चित्रपट स्वतंत्रपणे पाठवणे आवश्यक आहे. प्रवेशिका अर्जाविषयी अटी व शर्ती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC) संकेतस्थळावरून डाउनलोड केल्या जाऊ शकतात:
www.nhrc.nic.in किंवा लिंक: येथे क्लिक करा.
***
S.Patil/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2053861)
आगंतुक पटल : 175