पंतप्रधान कार्यालय

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट स्पर्धेत  कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडापटू होकातो होतोझे सेमा याचे केले अभिनंदन

Posted On: 07 SEP 2024 9:04AM by PIB Mumbai

 

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F57 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडापटू होकातो होतोझे सेमा याचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

होकातो होतोझे सेमा याने पुरुषांच्या शॉटपुट F57 मध्ये कांस्य पदक मिळवले, हा आपल्या देशासाठी एक अभिमानास्पद क्षण!  त्याची अतुलनीय शक्ती आणि दृढनिश्चय हे गुण विलक्षण आहेत.  होकातो होतोझे सेमा याचे अभिनंदन. भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.

#Cheer4Bharat"

***

M.Iyengar/S. Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2052735) Visitor Counter : 21