पर्यटन मंत्रालय
‘देखो अपना देश, पीपल्स चॉईस 2024' साठी 15 सप्टेंबरपर्यंत मतदान करण्याची सुविधा
Posted On:
06 SEP 2024 2:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली : 06 सप्टेंबर, 24.
भारतीय जनतेची नेमकी नस समजून घेण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने प्रथमच देशव्यापी (आय पी) बौदिध्क संपदा 'देखो अपना देश, पीपल्स चॉइस 2024' हा उपक्रम विकसित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीनगरमध्ये 7 मार्च 2024 रोजी या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. आता या उपक्रमानुसार नागरिकांना 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मतदान करता येणार आहे.
अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारसा, निसर्ग आणि वन्यजीव, साहसी आणि इतर पर्यटन स्थळे अशा पाच पर्यटन श्रेणींमध्ये सर्वाधिक पसंतीची पर्यटन स्थळे निवडण्यासाठी आणि पर्यटकांच्या धारणा समजून घेण्यासाठी नागरिकांशी संवाद साधणे, हा राष्ट्रव्यापी सर्वेक्षणामागे उद्देश आहे. चार मुख्य श्रेण्यांव्यतिरिक्त, 'इतर' श्रेणी ही अशी आहे जिथे एखादी व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक पसंतीच्या स्थळासाठी मत देऊ शकते आणि ‘ वायब्रंट बॉर्डर व्हिलेज’ , वेलनेस टुरिझम , वेडिंग टुरिझम सारख्या अनपेक्षित पर्यटन आकर्षणे आणि गंतव्यस्थानांच्या रूपामध्ये अनेक ठिकाणे असतात. या पर्यटन रत्नांचा परिचय सर्वांना व्हावा, यासाठी हा उपक्रमाची मदत होणार आहे.
नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या आवडत्या पर्यटन स्थानाला मतदान करावे, यासाठी एक समर्पित पोर्टल तयार केले आहे. -
https://innovateindia.mygov.in/dekho-apna-desh/ या पोर्टलवर आपली उपस्थिती नोंदवून वापरकर्ते त्यांच्या मोबाइलव्दारे (आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारसा, निसर्ग आणि वन्यजीव साहस, इतर (खुली श्रेणी) मतदान करू शकतात. यामध्ये मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी नोंदवावा लागणार आहे.
यामुळे भारतातील प्रमुख पर्यटन आकर्षणे निश्चित करण्यात मदत मिळणार आहे. या स्थानांसाठी संबंधित भागधारकांकडून भरीव पाठिंबा आणि गुंतवणूक मिळू शकणार आहे.
या उपक्रमाची सुरूवात करून, पर्यटन मंत्रालय भारताच्या विकसित भारत@2047 च्या प्रवासाला पाठिंबा देत आहे. मिशन मोडमध्ये, अल्प आणि मध्यम कालावधीत, विकासासाठी 'संपूर्ण सरकार' दृष्टिकोन समोर ठेवण्यात आला आहे. यातून सर्वाधिक आकर्षक, आवडते कोणते गंतव्यस्थान ठरेल, आणि ही स्पर्धा जिंकेल, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
या उपक्रमाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया भेट द्या:-
https://innovateindia.mygov.in/dekho-apna-desh/
***
S.Kane/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2052604)
Visitor Counter : 77