पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे मानद वरिष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांची भेट घेतली

प्रविष्टि तिथि: 05 SEP 2024 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरमध्ये त्या देशाचे मानद वरिष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांची भेट घेतली.

पंतप्रधान म्हणाले की, मानद वरिष्ठ मंत्री गोह यांनी सिंगापूरमध्ये 'इंडिया फिव्हर'ची सुरुवात केली,आणि सिंगापूरचे पंतप्रधान असताना भारत-सिंगापूर संबंधांकडे विशेष लक्ष दिले.त्यांच्या प्रयत्नांनी दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांच्या विकासाचा पाया भक्कम झाला. गोह यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्य काळात आणि त्यानंतर भारताला दिलेल्या बहुमोल पाठबळासाठी  पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली.

भारत-सिंगापूर संबंधांमधील ताज्या घडामोडींवर दोन्ही नेत्यांनी विचार मांडले, आणि परस्परांबरोबरचे द्विपक्षीय सहकार्य नव्या उंचीवर नेण्याच्या मार्गांवर विचारांची देवाणघेवाण केली.

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2052276) आगंतुक पटल : 86
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam