पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान तीन वंदे भारत रेल्वेगाड्यांना 31 ऑगस्ट रोजी हिरवा झेंडा दाखवणार
या रेल्वेगाड्या उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये कनेक्टीविटीला देणार चालना
प्रवासाचा वेळ कमी करून प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्याबरोबरच पर्यटनाला चालना देण्याचे नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांचे उद्दीष्ट
Posted On:
30 AUG 2024 2:59PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता दूरदृश्य माध्यमातून तीन वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनाला साकारणारी अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेस तीन रेल्वेमार्गांवरील कनेक्टीविटीला चालना देणार आहे, मीरत – लखनौ, मदुराई – बेंगळुरू आणि चेन्नई – नागरकोईल हे ते तीन मार्ग आहेत.
मीरत – लखनौ वंदे भारत या दोन शहरांमधील प्रवासाचा सध्याच्या सर्वाधिक वेगवान गाड्यांच्या तुलनेत सुमारे एक तास वेळ कमी करेल. तसेच, चेन्नई – नागरकोईल वंदे भारत आणि मदुराई – बेंगळुरू वंदे भारत या गाड्या प्रवासाचा अनुक्रमे दोन तासांहून अधिक आणि सुमारे दीड तास वेळ कमी करतील.
या नव्या वंदे भारत गाड्या उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांतील जनतेला वेगवान आणि आरामदायी प्रवासासह, जागतिक तोडीचे प्रवासाचे साधन उपलब्ध करून देतील. वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या रेल्वेसेवेतील समावेशामुळे नियमित रेल्वे प्रवास करणारे प्रवासी, व्यावसायिक, उद्योग व विद्यार्थी परिवाराच्या गरजा पूर्ण करत उच्च दर्जाची रेल्वे सेवा पुरवतील.
***
N.Chitale/R.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2050104)
Visitor Counter : 76
Read this release in:
Odia
,
Tamil
,
Assamese
,
English
,
Manipuri
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam