युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्याकडून पुष्पांजली


“सायकल चालवणे हा प्रदुषणावर उपाय” केंद्रीय मंत्र्यांचे राष्ट्रीय क्रीडा दिनी प्रतिपादन

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि रक्षा खडसे राष्ट्रीय क्रीडा दिनी रस्सीखेच आणि फूटबॉलच्या सामन्यात सहभागी

Posted On: 29 AUG 2024 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑगस्ट 2024

 

केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा आणि श्रम व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना आज  नवी दिल्ली इथे मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडागारात पुष्पांजली अर्पण केली. देशभरातली क्रीडापटूंचे प्रेरणास्थान राहिलेल्या हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना मानवंदना देण्यासाठी हा दिवस आहे.

त्यानंतर स्वास्थ्य आणि खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. मांडवीय आणि खडसे जवाहरलाल नेहरू क्रीडागारात गेल्या. तिथे उपस्थितांना संदेश देताना डॉ. मांडवीय यांनी सर्व नागरिकांनी राष्ट्रीय क्रीडा दिवशी किमान एक तास मैदानी खेळासाठी द्यावा, अशी आग्रहाची विनंती केली. भारतात शारिरीक स्वास्थ्य आणि खेळाच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा संदेश असल्याचे त्यांनी सांगितले.

   

“2047 मध्ये भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल तोपर्यंत या राष्ट्राला आपल्याला ‘विकसित भारत’ बनवायचे आहे,” असे डॉ. मांडवीय म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जे खेळणार ते बहरणार’ या उक्तीला धरून आपणा सर्वांनी खेळांत सक्रीय झाले पाहिजे. जगातील युवा राष्ट्रांपैकी एक म्हणून शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी खेळल्याने आपली प्रगती होईल,” असे त्यांनी सांगितले.

शारिरीक क्रियाशीलतेच्या पर्यावरणीय लाभांचे महत्त्व विषद करताना डॉ. मांडवीय यांनी व्यायाम म्हणून सायकल चालवण्याचा जोरदार पुरस्कार केला. “सायकल चालवणे हा प्रदुषणावर उत्तम उपाय,” अशी टिप्पणी त्यांनी केली आणि आरोग्य व पर्यावरणीय कारणांसाठी नागरिकांना सायकल चालवण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

   

क्रीडा दिनानिमित्त आयोजित रस्सीखेच आणि मैत्रीपूर्ण फूटबॉल सामन्यात भारतीय क्रीडा प्राधिकरण – एसएआयच्या अधिकाऱ्यांसह दोन्ही केंद्रीय मंत्री सहभागी झाले. खिलाडूवृत्ती आणि सक्रीय सहभाग ही क्रीडा दिवसाची संकल्पना त्यांनी कृतीतून अधोरेखित केली.

जवाहरलाल नेहरू क्रीडागारात झालेला राष्ट्रीय क्रीडा दिनाचा सोहळा बहुरंगी ठरला; त्यामध्ये इनडोअर व मैदानी खेळांचा समावेश होता. एसएआयचे जवळपास 700 कर्मचारी उत्साहाने एकत्र येत या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

   

 

* * *

N.Chitale/R.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2049786) Visitor Counter : 16