पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांना वाहिली आदरांजली.

Posted On: 29 AUG 2024 10:25AM by PIB Mumbai

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, समस्त देशवासियांना शुभेच्छा देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना मनःपूर्वक आदरांजली वाहिली आहे.

आज  ट्विट संदेशात पंतप्रधानांनी क्रीडाक्षेत्रामध्ये उत्कटतेने योगदान देणाऱ्या आणि जगातील मंचावर भारताचे अत्यंत अभिमानाने प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वांच्या कार्याचे मोल जाणून त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रत्येक तरुण भारतीय खेळ खेळण्याची आणि या क्षेत्रात चमकण्याची आकांक्षा पूर्ण करू शकेल अशी परिसंस्था निर्माण करण्यासाठी सर्व स्तरांवर क्रीडा क्षेत्राला पाठबळ देण्याप्रती सरकारच्या कटिबद्धतेचा देखील पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला.
एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा. आज आपण मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहत आहोत. ज्यांना क्रीडा क्षेत्राची अत्यंत आवड आहे तसेच ज्यांनी स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे अशा सर्वांची प्रशंसा करण्याचा हा क्षण आहे. क्रीडा क्षेत्राला पाठींबा देण्याप्रती आणि देशातील अधिकाधिक युवक-युवती खेळ खेळून या क्षेत्रात चमकू शकतील याची सुनिश्चिती करण्याप्रती आपले सरकार वचनबद्ध आहे.

***

NM/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2049694) Visitor Counter : 28