भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

रिलायन्स इंडस्ट्रीज् लिमिटेड, व्हायाकॉम18, डिजिटल18 मिडिया लिमिटेड, स्टार इंडिया प्रायवेट लिमिटेड आणि स्टार टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स लिमिटेड यांच्या एकत्रीकरणाला भारतीय स्पर्धा आयोगाकडून मंजुरी

Posted On: 28 AUG 2024 9:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2024


सीसीआय अर्थात भारतीय स्पर्धा आयोगाने रिलायन्स इंडस्ट्रीज् लिमिटेड (आरआयएल), व्हायाकॉम18, डिजिटल18 मिडिया लिमिटेड, स्टार इंडिया प्रायवेट लिमिटेड (एसआयपीएल) आणि स्टार टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स लिमिटेड (एसटीपीएल) यांच्या प्रस्तावित एकत्रीकरणाला ऐच्छिक बदलांच्या अनुपालनाच्या अटीसह मंजुरी दिली आहे.

एकत्रीकरणात व्हायाकॉम18, आरआयएल समूहाचा काही भाग आणि द वॉल्ट डिस्ने कंपनी (टीडब्ल्यूडीसी) च्या संपूर्ण मालकीत असलेली एसआयपीएल यांच्या मनोरंजन व्यवसायासह इतर काही ठराविक व्यवसायांचा संयोग प्रस्तावित आहे. एकत्रीकरणामुळे सध्या टीडब्ल्यूडीसीच्या पूर्णपणे मालकीची असलेली एसआयपील ही आरआयएल, व्हायाकॉम18 आणि टीडब्ल्यूडीसीच्या अनुषंगी कंपन्यांच्या संयुक्त मालकीचा उपक्रम (जॉइंट व्हेंचर) होईल.

आरआयएल भारतात आणि जगभरात थेट किंवा अप्रत्यक्षरित्या तेल व वायू समन्वेषण आणि उत्पादन, पेट्रोलियम रिफायनिंग आणि विपणन, पेट्रोकेमिकल्सचे उत्पादन व विक्री, रसायनांचे उत्पादन व विक्री, संघटित किरकोळ उद्योग, माध्यमे आणि मनोरंजन उपक्रम, दूरसंवाद व डिजिटल सेवा उद्योगांत कार्यरत आहे.

व्हायाकॉम18 भारतासह जगभरात दूरचित्रवाहिन्यांचे प्रसारण, ओटीटी मंच चालवणे, दूरचित्रवाहिन्यांना व्यावसायिक जाहिरातीच्या जागांची विक्री करणे, उत्पादनांसाठी परवाना पूर्तता आणि थेट समारंभांचे आयोजन आदी विविध व्यवसायांमध्ये आहे. व्हायाकॉम18 चित्रपटांच्या निर्मिती आणि वितरणातही कार्यरत आहे.

एसआयपीएल माध्यमविषयक विविध उपक्रमांमध्ये कार्यरत आहे. त्यामध्ये दूरचित्रवाणी प्रसारण, दूरदृश्य माध्यमांसाठी सामग्री आणि चित्रपटांची निर्मिती, ओटीटी मंच चालवणे, ओटीटी मंच आणि दूरचित्रवाहिन्यांना व्यावसायिक जाहिरातीच्या जागांची विक्री करणे आदींचा समावेश आहे.

एसटीपीएल ही कंपनी ब्रिटिश व्हर्जिन बेटांवरील मान्यताप्राप्त कंपनी असून तिची संपूर्ण मालकी अप्रत्यक्षरित्या टीडब्ल्यूडीसीकडे आहे.

आयोगाने प्रस्तावित एकत्रीकरणाला ऐच्छिक बदलांच्या अनुपालनाची अट घालून मंजुरी दिली आहे.

आयोगाचा सविस्तर आदेश लवकरच अपेक्षित आहे.


S.Patil/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2049580) Visitor Counter : 46