सहकार मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज छत्तीसगडमधील रायपूर येथे राज्यातील सहकारी संस्थांच्या विस्ताराबाबत आढावा बैठकीचे आयोजन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सहकार से समृद्धी’ हे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील प्रत्येक पंचायतीमध्ये एक सहकारी संस्था स्थापन केली जात आहे.

प्रत्येक प्राथमिक कृषी पतसंस्थेने (पॅक्स) संगणकीकरणानंतर सामान्य सेवा केंद्र म्हणून काम करायला सुरुवात करावी, जेणेकरून पॅक्सच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे लाभ ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचतील

Posted On: 25 AUG 2024 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्ट 2024

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज छत्तीसगडमधील रायपूर येथे राज्यातील सहकारी संस्थांच्या विस्ताराबाबत आढावा बैठक झाली. अमित शाह यांनी 33 जिल्ह्यांमध्ये पाणी समित्या म्हणून प्राथमिक कृषी पतसंस्थांचा (पॅक्स) देखील प्रारंभ केला.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाचा एक भाग म्हणून, “पीपल फॉर पीपल” कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण केले तसेच छत्तीसगड सरकारच्या विविध विकास कामांचे उद्घाटन केले.

सहकार आढावा बैठकीतील आपल्या भाषणात केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “सहकार से समृद्धी” हे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील प्रत्येक पंचायतीमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्यात येत आहे.

संगणकीकरण झाल्यानंतर  प्रत्येक पॅक्सला सामान्य सेवा केंद्र बनवायला हवे, जेणेकरून पॅक्स द्वारे हाती घेण्यात येणाऱ्या  विविध उपक्रमांचे लाभ ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचू शकतील यावर त्यांनी भर दिला.

   

अमित शाह म्हणाले की, इथेनॉल उत्पादनासाठी एनसीसीएफ, नाफेड आणि राज्य यांच्यात करार व्हायला हवा, जेणेकरून शेतकऱ्यांना मका लागवडीसाठी प्रोत्साहित करता येईल. मका लागवडीचा खर्चही कमी असून, केंद्र सरकारकडून किमान हमीभावात शेतकऱ्यांचा सर्व मका खरेदी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीसाठी पॅक्स द्वारे नाफेड आणि एनसीसीएफ पोर्टलवर 100% नोंदणी कव्हायला हवी असे शाह म्हणाले.

प्रत्येक बाजारातील प्रत्येक व्यापारी, पॅक्स आणि सहकारी संस्थांनी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत खाते उघडणे बंधनकारक असायला हवे असे केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2048780) Visitor Counter : 10