मंत्रिमंडळ
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या ‘विज्ञान धारा’ योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
24 AUG 2024 8:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज तीन प्रमुख योजना यापुढेही सुरू ठेवण्यास मंजुरी दिली. या तीनही योजना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (DST) ‘विज्ञान धारा’ या एकात्मिक केंद्रीय क्षेत्रातील योजनेत विलीन करण्यात आल्या आहेत.
योजनेत तीन व्यापक घटक आहेत:
- विज्ञान आणि तंत्रज्ञान (S&T) संस्थात्मक आणि मानवी क्षमता निर्माण
- संशोधन आणि विकास
- नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास आणि उपयोजन
पंधराव्या वित्त आयोगाच्या 2021-22 ते 2025-26 या कालावधीत ‘विज्ञान धारा’ या एकीकृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित खर्च सुमारे 10,579.84 कोटी रुपये इतका आहे.
या तीनही योजनांचे एकाच योजनेत विलीनीकरण केल्याने निधी वापरात कार्यक्षमता वाढेल आणि उप-योजना तसेच कार्यक्रमांमध्ये समन्वय स्थापित होईल.
'विज्ञान धारा' योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट देशातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिसंस्था मजबूत करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमता निर्माण तसेच संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देणे, हे आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे शैक्षणिक संस्थांमध्ये सुसज्ज संशोधन आणि विकास प्रयोगशाळांची संख्या वाढवून देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणखी मजबूत होतील.
ही योजना आंतरराष्ट्रीय मेगा सुविधांच्या उपलब्धतेसह मूलभूत संशोधन, शाश्वत ऊर्जा, पाणी इत्यादींमधील अनुवादात्मक संशोधन आणि आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्याद्वारे सहयोगी संशोधन यासारख्या क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना देण्याचा प्रयत्न करते. हे विज्ञान आणि तंत्रज्ञान परिदृश्य मजबूत करण्यासाठी आणि पूर्ण-वेळ समतुल्य (FTE) संशोधक संख्या सुधारण्यासाठी देशाच्या संशोधन आणि विकास आधाराचा विस्तार करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानव संसाधन पूल तयार करण्यात देखील योगदान देईल. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष (STI) क्षेत्रात लैंगिक समानता आणण्याच्या अंतिम उद्दिष्टासह विज्ञान आणि तंत्रज्ञान (S&T) क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्रित उपाय योजिले जातील. ही योजना शालेय स्तरापासून ते उच्च शिक्षणापर्यंत आणि लक्ष्यित उपायांद्वारे उद्योग आणि स्टार्टअपसाठी सर्व स्तरांवर नवोन्मेषाला चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना बळ देईल. शैक्षणिक संस्था, सरकार आणि उद्योग यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाठिंबा दिला जाईल.
'विज्ञान धारा' योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेले सर्व कार्यक्रम विकसित भारत 2047 चा दृष्टिकोन साकार करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पाच वर्षांच्या उद्दिष्टांशी संरेखित केले जातील. योजनेतील संशोधन आणि विकास घटक अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या (ANRF) अनुषंगाने संरेखित केले जातील. या योजनेची अंमलबजावणी राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी सुसंगत असून ती जागतिक स्तरावर प्रचलित असलेल्या मापदंडांचे पालन करेल.
पार्श्वभूमी:
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रमांचे आयोजन, समन्वय आणि प्रोत्साहन यासाठी नोडल विभाग म्हणून काम करतो. देशात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष (STI) यांना प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे तीन केंद्रीय क्षेत्रातील छत्र योजना पूर्वीपासूनच राबविण्यात येत आहेत. (i) विज्ञान आणि तंत्रज्ञान (S&T) संस्थात्मक आणि मानवी क्षमता निर्माण, (ii) संशोधन आणि विकास आणि (iii) नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास आणि उपयोजन; या तिन्ही योजना ‘विज्ञान धारा’ या एकीकृत योजनेत विलीन करण्यात आल्या आहेत.
* * *
S.Nilkanth/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2048622)
Visitor Counter : 75
Read this release in:
Odia
,
English
,
Khasi
,
Urdu
,
Nepali
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam