संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री 23 ते 26 ऑगस्ट 2024 या काळात अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन यांच्यासोबत होणार द्विपक्षीय बैठक
भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन
Posted On:
21 AUG 2024 3:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2024
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन यांच्या आमंत्रणाला मान देत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येत्या 23 ते 26 ऑगस्ट 2024 या काळात अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. या अमेरिका भेटीदरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन यांच्यादरम्यान द्विपक्षीय बैठक होणार आहे. या दौऱ्यात, संरक्षणमंत्री अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण व्यवहार संस्थेचे अध्यक्ष जेक सुलीव्हन यांची देखील भेट घेणार आहेत.
भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांना मिळत असलेली वाढती गती आणि दोन्ही देशांदरम्यान विविध पातळ्यांवर संरक्षणविषयक गुंतवणुकींच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे. या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी सखोल आणि विस्तृत होईल अशी अपेक्षा आहे.
या अमेरिका भेटीदरम्यान, दोन्ही देशांदरम्यान सध्या असलेल्या तसेच भविष्यात होऊ घातलेल्या संरक्षणविषयक सहयोगासंदर्भात अमेरिकेच्या संरक्षण उद्योगांसोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्च-स्तरीय गोलमेज बैठकीचे आयोजन देखील केले जाणार आहे.
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2047275)
Visitor Counter : 56