संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री जपानच्या संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांसोबत नवी दिल्लीतील तिस-या 2+2 मंत्रिस्तरीय संवाद परिषदेचे भूषवणार यजमानपद


संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री किहारा मिनोरू यांची द्विपक्षीय बैठक

उभय देशांमधील संरक्षण सहकार्य व विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्याचा संवादांचा उद्देश

Posted On: 19 AUG 2024 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑगस्ट 2024

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर हे 20 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या तिसऱ्या भारत-जपान 2+2 मंत्रिस्तरीय संवाद परिषदेचे  यजमानपद भूषवणार आहेत.  जपानचे संरक्षण मंत्री  किहारा मिनोरू आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री  योको कामिकावा यावेळी उपस्थित राहणार आहेत. या  2+2 संवाद परिषदेमध्ये संरक्षण  मंत्री आणि त्यांचे जपानी समकक्ष यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे.

द्विपक्षीय चर्चा आणि 2+2 बैठकीदरम्यान, मंत्री द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतील आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी नवीन उपक्रमांचा शोध घेतील. दोन्ही देशांचे नेते परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारविनिमय करतील.

भारत आणि जपान लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य या सामायिक मूल्यांवर आधारित 'विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी' सामायिक करतात. संरक्षण हा या नात्यातील सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हणून उदयास आला आहे. प्रचलित मुक्त  जागतिक वातावरणात  सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद-प्रशांत सहकार्य  सुनिश्चित करण्यासाठी मजबूत भारत-जपान संरक्षण भागीदारी महत्त्वपूर्ण आहे.

या भेटीमुळे उभय देशांमध्‍ये संरक्षण सहकार्य आणखी वाढेल आणि दोन्ही देशांमधील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक सखोल आणि दृढ  होईल. यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये दुस-या  भारत-जपान 2+2 संवाद परिषदेचे जपानमध्ये आयोजन करण्यात आले होते.

 

* * *

S.Kakade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2046682) Visitor Counter : 35