अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

ईओएस-08 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे इस्रोने केले प्रक्षेपण

Posted On: 16 AUG 2024 1:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2024

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सकाळी 9 वाजून 17 मिनिटांनी ईओएस-08 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे (SSLV)-D3 या लघु उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने प्रक्षेपण केले.

मायक्रोसॅटेलाईट बसला अनुरुप असलेली पेलोड सामग्री तयार करून आणि भावी परिचालनात्मक उपग्रहांना लागणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाचा समावेश करून  मायक्रोसॅटेलाईटची(सूक्ष्मउपग्रह) रचना आणि विकास करणे ही ईओएस-08 मोहिमेची प्राथमिक उद्दिष्टे आहेत.

मायक्रोसॅट/आयएमएस-1 बसवर बांधणी करण्यात आलेल्या ईओएस-08 वर इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड पेलोड(EOIR), ग्लोबल नेव्हीगेशन सॅटेलाईट सिस्टिम- रिफ्लेक्टोमेट्री पेलोड(GNSS-R) आणि एसआयसी यूव्ही डोसीमीटर हे तीन पेलोड(उपकरणे) आहेत. उपग्रहाद्वारे होणारी टेहळणी, आपत्ती देखरेख, पर्यावरण देखरेख, अग्निशोध, ज्वालामुखीय हालचालींचे निरीक्षण आणि औद्योगिक आणि ऊर्जा प्रकल्पांमधील आपत्ती देखरेख यांसारख्या कामांसाठी मिड वेव्ह आयआर(MIR) आणि लॉन्ग वेव्ह आयआर(LWIR) बँड्समध्ये दिवसा आणि रात्री या दोन्ही वेळी, प्रतिमा ग्रहण करण्यासाठी ईओआयआरची रचना करण्यात आली आहे.

सागरी पृष्ठभागावरील वाऱ्यांचे विश्लेषण, मृदा आर्द्रता मूल्यांकन, हिमालय प्रदेशावरील  क्रायोस्फिअर अभ्यास, पूर शोध आणि अंतर्गत जलाशय शोध यांसारख्या उपयोजनांसाठी जीएनएसएस-आर आधारित रिमोट सेन्सिंगचा वापर करण्याची क्षमता जीएनएसएस-आर या उपकरणात आहे. दरम्यान, एसआयसी यूव्ही डोसिमीटर गगनयान मोहिमेतील क्रू मॉड्यूलच्या व्ह्यूपोर्टवर अतिनील विकीरणावर देखरेख ठेवते  आणि गॅमा रेडिएशनसाठी हाय डोस अलार्म सेन्सर म्हणून काम करते.

हा उपग्रह पृथ्वीपासून 475 किमी उंचीवर पृथ्वीजवळच्या खालच्या वर्तुळाकार कक्षेत 37.4° कोनात कार्यरत राहील आणि त्याचे मोहीम आयुर्मान एक वर्षाचे आहे. त्याचे वजन सुमारे 175.5 किलो आहे आणि तो सुमारे 420 वॉट ऊर्जानिर्मिती करू शकतो. एसएसएलव्ही डी-3 प्रक्षेपकाला तो जोडलेला आहे.

दळणवळण, बेसबँड, साठवणूक आणि पोझिशनिंग(CBSP) पॅकेज म्हणून  ओळखली जाणारी इंटेग्रेटेड एव्हीयॉनिक्स प्रणालीसारख्या सॅटेलाईट मेनफ्रेम प्रणालीमधील एका उल्लेखनीय प्रगतीला ईओएस-08 प्रदर्शित करत आहे  जी प्रणाली सर्वांचे एकत्रिकरण करून एकच कार्यक्षम एकक म्हणून काम करण्यात सक्षम आहे. कमर्शियल ऑफ  द शेल्फ (COTS) भाग आणि 400 जीबी डेटा स्टोरेजपर्यंतची सुविधा देणाऱ्या इव्हॅल्युएशन बोर्डचा वापर करून कोल्ड रिडन्डन्ट प्रणालीसह या प्रणालीची रचना करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त या उपग्रहात पीसीबीमध्ये सामावलेले एक स्ट्रक्चरल पॅनेल, त्यात बसवलेली बॅटरी, एक मायक्रो-डीजीए(ड्युअर गिंबल ऍन्टेना), एक एम-पीएए(फेज्ड ऍरे ऍन्टेना) आणि एक फ्लेक्झिबल सोलार पॅनेल अशी महत्त्वाची उपकरणे ऑनबोर्ड तंत्रज्ञान प्रदर्शनासाठी बसवण्यात आली आहेत.

या उपग्रहात त्याच्या ऍन्टेना पॉइंटिंग यंत्रणेत लघुरुप(मिनीएचराईज्ड) रचना करण्यात आली असून त्यामुळे तिची फिरण्याची गती प्रतिसेकंद सहा अंश इतकी आहे आणि तिची पॉइंटिंग अचूकता ±1 अंश इतकी आहे.  ही मिनिएचराईज्ड फेज्ड ऍरे ऍन्टेना दळणवळण क्षमता आणखी जास्त वृद्धिंगत करते, तर फ्लेक्झिबल सोलार पॅनेलमुळे सोलार पॅनेलची उघडझाप करणे शक्य होते. तसेच जीएफआरपी ट्यूब आणि सीएफआरपी हनॉकॉम्ब रिजिड एंड पॅनेल अधिक चांगल्या प्रकारे ऊर्जानिर्मितीची आणि रचनात्मक मजबुतीची सुविधा देते.

अतिशय उच्च म्हणजे 350 W/mK च्या औष्णिक वहनक्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पायरोलिटिक ग्राफाईट शीड डिफ्युजर प्लेट मुळे वजन कमी होते आणि उपग्रहांच्या विविध प्रकारच्या कामामध्ये ती उपयुक्त ठरते. त्याबरोबरच ईओस-8 मोहिमेत बिजागर-आधारित रचनेचा वापर करून एका नव्या एकात्मिक हाऊसकिपिंग पॅनेल पद्धतीचा अंगिकार करण्यात आला आहे, ज्यामुळे ऍसेंब्ली, इंटेग्रेशन आणि टेस्टिंग(AIT) चा कालावधी लक्षणीय रित्या कमी झाला आहे.

अतिरिक्त नावीन्यपूर्ण पद्धतींचा समावेश करून ईओएस-08 ही मोहीम पल्स शेपिंगचा आणि एक्स बँड ट्रान्समिटरसाठी फ्रिक्वेन्सी कॉम्पन्सेटेड मॉड्युलेशनचा वापर करून एक्स बँड डेटा ट्रान्समिशनच्या माध्यमातून उपग्रह तंत्रज्ञानात सुधारणा करत आहे. या उपग्रहाच्या बॅटरी व्यवस्थापन प्रणालीत एसएसटीसीआर आधारित चार्जिंग आणि बस रेग्युलेशनचा समावेश असून 6 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीला स्ट्रिंगना क्रमवार समाविष्ट करणे किंवा वगळण्याचे काम करते.

या उपग्रहाच्या सोलार सेलच्या निर्मिती प्रक्रियेत आणि सूक्ष्मउपग्रह उपयोजनासाठी नॅनो-स्टार सेन्सरद्वारे  या मोहिमेच्या स्वदेशीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांचा दाखला मिळतो. त्याशिवाय कंपने कमी करणाऱ्या रिऍक्शन व्हील आयसोलेटर्समुळे जडत्वीय प्रणालीचे लाभ मिळतात आणि टीटीसी आणि एसपीएस ऍप्लिकेशनसाठी एकाच ऍन्टेना इंटरफेसचा वापर करण्यात आला आहे. कॉट्स कॉम्पोनन्टच्या(COTS components) औष्णिक गुणधर्मांची हाताळणी करण्यासाठी एएफई, बीजीए, किन्टेक्स एफपीजीए, जर्मेनियम ब्लॅक कॅप्टॉन आणि स्टेमेट( सिलिका-ऍल्युमिनियम मिश्रधातू)  यांसारख्या सामग्रीचा वापर करून औष्णिक व्यवस्थापनात वाढ करण्यात आली आहे. या मोहिमेत ऑटो लॉन्च पॅड इनिशियलायजेशन वैशिष्ट्याचा देखील समावेश आहे ज्यातून तिची नवोन्मेषी मोहीम व्यवस्थापनाबाबतची वचनबद्धता दिसून येते.

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2045871) Visitor Counter : 114