कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या लोकपाल कार्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळा

Posted On: 15 AUG 2024 4:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्ट 2024

 

78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारताचे लोकपाल माननीय न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांनी राष्ट्रीय ध्वज फडकवला. या वेळी माननीय सदस्य संजय यादव, सुशील चंद्र, पंकज कुमार आणि अजय तिर्के यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर त्यांनी सर्व सन्माननीय सदस्य, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वतंत्र भारतासाठी ज्यांनी आपले प्राण दिले त्या सर्वांच्या बलिदानाचेही त्यांनी स्मरण केले.

ते पुढे म्हणाले की, “आपल्या देशाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत आहे आणि भारत आत्मनिर्भर आणि विकसित होण्यासाठी प्रयत्नरत आहे. या प्रगतीसह व्यापारिक हालचाली सुद्धा वाढत आहेत आणि काही अनैतिक व्यवहार करणाऱ्या  नागरिकांची लालसा देखील वाढली आहे. म्हणूनच पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला समर्थन देणारी आणि पहारेकरी म्हणून काम करणारी लोकपाल सारखी संस्था असणे आवश्यक आहे.“

यावेळी त्यांनी लोकपाल कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संविधानाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या विशेष प्रसंगी अध्यक्ष आणि सदस्यांनी वृक्षारोपणही केले.

  

 

* * *

H.Akude/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2045654) Visitor Counter : 43