माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दृकश्राव्य बातम्यांचे सर्वसमावेशक प्रसारण करण्यासाठी प्रसारभारतीने सुरु केली ‘पीबी-शब्द’ सेवा


पीबी-शब्द द्वारे उपलब्ध सामग्री लोगो मुक्त असून त्याचा वापर करताना श्रेय देण्याची आवश्यकता नाही

पीबी-शब्द च्या सदस्यांना दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या संग्रहातील दुर्मिळ कार्यक्रमांचा आनंद मिळणार

मार्च 2025 पर्यंत माध्यम संस्थांना विनामूल्य साइन-अप आणि वापर करता येणार

Posted On: 14 AUG 2024 8:22PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024

 

प्रसार भारतीने, 13 मार्च 2024 रोजी माध्यम संस्थांना व्हिडीओ, ऑडिओ, लिखित मजकूर आणि फोटोंसह विविध स्वरूपातील दैनंदिन बातम्या पुरवण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या, पीबी-शब्द (PB-SHABD) या ‘न्यूज शेअरिंग’ (बातम्या सामाईक करणे) सेवेचा शुभारंभ केला.

सर्वसमावेशक वार्तांकनासाठी विस्तृत नेटवर्क

चोवीस तास कार्यरत असलेल्या 60 समर्पित संपादन डेस्कच्या सहाय्याने 1500 हून अधिक पत्रकार, वार्ताहर आणि स्ट्रिंगर्सच्या मजबूत नेटवर्कचा लाभ घेत, पीबी-शब्द सेवा भारताच्या कानाकोपऱ्यातील ताज्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवते. प्रादेशिक वृत्त विभाग (RNUs) आणि मुख्यालये एकत्रितपणे सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये कृषी, तंत्रज्ञान, परराष्ट्र व्यवहार आणि राजकीय घडामोडी यांसारख्या 50 हून अधिक बातम्यांच्या श्रेणीत समाविष्ट असलेल्या 1000  हून अधिक बातम्या, दररोज अपलोड करतात.

पीबी-शब्द (PB-SHABD) सेवेची प्रमुख वैशिष्ट्ये  

पीबी-शब्द द्वारे उपलब्ध सामग्री लोगो-मुक्त आहे आणि या व्यासपीठावरील सामग्री वापरण्यासाठी श्रेय देण्याची आवश्यकता नाही. याव्यतिरिक्त, या सेवेमध्ये लाइव्ह फीडचे (थेट प्रक्षेपण) वैशिष्ट्य समाविष्ट आहे, जे राष्ट्रपती भवनातील राष्ट्रीय पुरस्कार समारंभ, निवडणूक रॅली, महत्त्वाचे राजकीय कार्यक्रम आणि विविध पत्रकार परिषदा, यासारख्या थेट कार्यक्रमांचे विशेष वार्तांकन उपलब्ध करते, जे लोगोशिवाय उपलब्ध आहे.  

या सेवेची पोहोच अधिक वाढविण्यासाठी, अभिलेखीय कोश म्हणून माध्यम भांडार विकसित केले जात आहे, ज्यामुळे ग्राहकांना विशेष तयार करण्यात आलेल्या पॅकेजेससह दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या संग्रहातील दुर्मिळ आणि पुनर्संचयित कार्यक्रम सहज पाहता येतील.

पीबी-शब्द माध्यम संस्थांना साइन अप करण्यासाठी आणि वापरण्यासाठी मार्च 2025 पर्यंत विनामूल्य आहे. इच्छुक संस्थांना पुढील व्यासपीठावर नोंदणी करता येईल:

https://shabd.prasarbharati.org/register

ताज्या माहितीसाठी पीबी-शब्द X वर (पूर्वीचे ट्विटर) https://x.com/PBSHABD येथे आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) https://www.instagram.com/pbshabd/ येथे उपलब्ध आहे.

 

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2045429) Visitor Counter : 86