ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय मानक ब्युरोने पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्राचे मानकीकरण या विषयावर आयोजित केली कार्यशाळा


भारतीय मानक ब्युरोने केली पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्राशी निगडित समर्पित विभागाची निर्मिती

Posted On: 13 AUG 2024 11:04AM by PIB Mumbai

भारताची राष्ट्रीय मानक संस्था, भारतीय मानक ब्युरोने (BIS), पर्यावरण आणि पर्यावरणाशी संबंधित समस्यांचे मानकीकरण करण्याच्या उद्देशाने पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र विभाग (EED) नावाने एका नवीन विभागाची निर्मिती केली आहे.

नव्याने स्थापित झालेल्या या विभागाच्या भविष्यातील कार्यवाहीविषयी मजबूत पायाभरणी करण्यासाठी ब्युरोने पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्राचे मानकीकरण या विषयावर 12.08.2024 रोजी कार्यशाळा आयोजित केली होती.

पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र या नवीन विभागाच्या स्थापनेतून आम्ही सर्वोत्तम मानकीकरणासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता तर करत आहोतच शिवाय पर्यावरणशास्त्राशी संबंधित गरजांविषयीचे प्रश्न सोडवण्यासाठी एका सर्वसमावेशक कृती आराखड्याची निर्मिती देखील करत आहोत, असे भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी आपल्या बीजभाषणात सांगितले. भारतासह संपूर्ण जगासाठी मानके तयार करण्याचा ब्युरोचा उद्देश आहे. जागतिक शाश्वततेच्या क्षेत्रात एक मैलाचा दगड किंवा बेंचमार्क प्रस्थापित करण्यासह पर्यावरणीय मानकीकरण या विषयात नेतृत्व करण्याच्या दृष्टीने बीआयएस येत्या दोन महिन्यांमध्ये काही कार्यशाळा आयोजित करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (MOEFCC) सचिव, लीना नंदन, या कार्यशाळेला  प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. "ज्यावेळी आपण मानकीकरण या विषयावर संभाषण करतो त्यावेळी या क्षेत्रातील तज्ञ, सल्लागार आणि भागधारक यांच्यात परस्परसंवाद असणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, "असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. समाजावर परिणाम करणाऱ्या वैविध्यपूर्ण श्रेणीतील घटकांसाठी मानके निर्माण करण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, भारतीय मानक ब्युरो आणि सर्व भागधारकांमध्ये सहकार्य असण्याची नितांत गरज आहे, अशा प्रकारचे सहकार्य इको-मार्क, पर्यावरणावर हानिकारक परिणाम न करता उत्पादन केलेल्या लाकडाशी संबंधित मानके आणि पद्धती किंवा ब्लू फ्लॅग बीचेस इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रभावी ठरेल, असे त्या म्हणाल्या.

या कार्यशाळेत देशाच्या विविध भागातून आलेले 100 हून अधिक तज्ञ  सहभागी झाले होते.

***

JPS/BhaktiS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2044783) Visitor Counter : 49