श्रम आणि रोजगार मंत्रालय

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपले सदस्य आणि निवृत्तीवेतनधारकांना शिक्षित करण्यासाठी 13 ऑगस्ट 2024 रोजी 5 वे थेट प्रसारणसत्र करणार आयोजित

Posted On: 12 AUG 2024 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्ट 2024

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) 13 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता “कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हस्तांतरण” या विषयावर 5 वे थेट प्रसारणसत्र आयोजित करणार आहे. हे थेट प्रसारणसत्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या फेसबुक (@socialepfo), इन्स्टाग्राम (@social_epfo) आणि युट्यूब (@socialepfo) खात्यांवर आयोजित केले जाईल.  सत्रादरम्यान, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हस्तांतरणाचे महत्त्व, त्याची प्रक्रिया, यूएएन किंवा एमआयडी विलीन करणे, इत्यादींसह सहभागींच्या प्रश्नांची तज्ञांकडून उत्तरे दिली जातील.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपले सदस्य आणि निवृत्तीवेतनधारकांना विविध सेवांबद्दल शिक्षित करण्याच्या उद्देशाने दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी थेट सत्राचे आयोजन करते.

पहिले थेट सत्र 14 मे 2024 रोजी “ईपीएस 95’ योजना” या विषयावर आयोजित करण्यात आले होते.  31 जुलै 2024 रोजी “गोठवलेली खाती” या विषयावर एक विशेष थेट प्रसारणसत्र आयोजित करण्यात आले होते कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात येत होते.

या संवादात्मक सत्रांचे उद्दिष्ट मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करणे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे तसेच सदस्य आणि निवृत्तीवेतनधारकांचे जीवन सुलभ करणे हे आहे.  ही अभ्यासपूर्ण सत्रे सदस्यांना नवीनतम सुधारणा आणि घडामोडींबद्दल माहिती देतात आणि अपडेट राहण्यासाठी मार्गदर्शन करतात.

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2044721) Visitor Counter : 32