पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तिमोर लेस्तेच्या सर्वोच्च ‘कॉलर ऑफ दि ऑर्डर’ पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला अभिमान

Posted On: 11 AUG 2024 11:07AM by PIB Mumbai

 

तिमोर लेस्ते या राष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार समजल्या जाणाऱ्याकॉलर ऑफ दि ऑर्डरपुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौरवण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून अभिमान व्यक्त केला आहे. या प्रतिष्ठेच्या सन्मानाने भारत आणि तिमोर लेस्ते या देशांमधील खोलवर रुजलेले बंध आणि परस्परांप्रती असलेला आदर अधोरेखित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आपल्या ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे कीराष्ट्रपतीजी यांचा तिमोर लेस्तेच्या सर्वोच्चकॉलर ऑफ दि ऑर्डरपुरस्काराने गौरव होत असताना पाहणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यातून आपल्या देशांमधील मजबूत बंध आणि परस्परांप्रती असलेला आदर प्रतिबिंबित होत आहे. अनेक वर्षांपासून जनसेवेतल्या त्यांच्या संस्मरणीय योगदानाचाही हा सन्मान आहे.”

***

M.Iyengar/S.Naik/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2044269) Visitor Counter : 65