पंतप्रधान कार्यालय
विनेश, तू विजेत्यांमधली विजेती आहेस : पंतप्रधान
आजची घटना दुःखद आहे. आज जी निराशेची भावना मी अनुभवत आहे ती शब्दात व्यक्त करणे कठीण आहे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2024 1:16PM by PIB Mumbai
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवले गेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाचे दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे;
'' विनेश, तू विजेत्यांमधली विजेती आहेस. तू भारताचा गौरव आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस.
आजच्या घटनेमुळे दुःख झाले. आज जी निराशेची भावना मी अनुभवत आहे ती शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.
पण याचबरोबर मी तुझी खंबीर वृत्ती जाणतो. आव्हानांना सामोरे जाणे, हे तुझ्या स्वभावातच आहे.
खंबीरपणे उभी राहा ! आम्ही सर्व जण तुझ्यासोबत आहोत.
***
JPS/SK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2042549)
आगंतुक पटल : 176
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam