वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मान्यताप्राप्त स्टार्टअप्स द्वारे 15.53 लाख थेट रोजगार निर्मिती

Posted On: 06 AUG 2024 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2024

केंद्र सरकारने देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेमध्ये नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी तसेच स्टार्ट-अप आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक मजबूत परिसंस्था तयार करण्याच्या उद्देशाने 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केला.

19 फेब्रुवारी 2019 च्या जीएसआर अधिसूचना 127(E) अंतर्गत विहित केलेल्या पात्रता अटींनुसार उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत संस्थांना 'स्टार्टअप' म्हणून मान्यता दिली जाते. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने  30 जून 2024 पर्यंत 1,40,803 आस्थापनांना स्टार्टअप म्हणून मान्यता दिली आहे. वर्ष 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू झाल्यापासून, मान्यताप्राप्त स्टार्टअप्सनी 15.53 लाखांहून अधिक थेट नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.

Year

Number of Direct Jobs Created by DPIIT

Recognised Startups

2016

306

2017

51,980

2018

1,00,646

2019

1,63,463

2020

1,81,404

2021

2,10,545

2022

2,74,685

2023

3,91,943

2024*

1,78,316

Total*

15,53,288

*As on 30th   June 2024

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2042264) Visitor Counter : 71