कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम विश्वकर्मा योजना 18 क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्यक्ष त्यांचे हात आणि विविध साधने याद्वारे कार्य करणाऱ्या कारागीर आणि हस्तकलाकारांना शेवटच्या टप्प्यापर्यंत पाठबळ पुरवते


कारागीर आणि हस्तकलाकारांच्या पारंपारिक कौशल्यांमध्ये वृद्धी आणि आधुनिकीकरण

Posted On: 05 AUG 2024 3:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 ऑगस्ट 2024

 

देशातील 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कारागीर आणि हस्तकलाकारांच्या पारंपरिक कौशल्याची वृद्धी आणि आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने मूलभूत कौशल्य प्रशिक्षणाच्या स्वरूपात औपचारिक प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेच्या मूलभूत कौशल्य प्रशिक्षणाअंतर्गत प्रशिक्षित उमेदवारांची राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार 19 जुलै 2024 पर्यंतची संख्या परिशिष्ट-I मध्ये दिली आहे.

पी एम विश्वकर्मा योजना 18 क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या आणि आपल्या हातांनी आणि साधनांनी कार्य करणाऱ्या कारागीर आणि हस्तकलाकारांना शेवटच्या टप्प्यापर्यंत पाठबळ देण्याच्या उद्देशाने 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये प्रधान मंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख, कौशल्य वृद्धी, साहित्य भत्ता, कर्जाची सुविधा, डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन आणि विपणन समर्थन यांचा समावेश आहे. पारंपरिक कारागीर आणि हस्तकलाकारांना उद्योजक आणि आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील आणि  महाराष्ट्रातील कारागिरांची एकूण नावनोंदणी आणि यशस्वी नोंदणीचा तपशील परिशिष्ट-II मध्ये दिला आहे.

या योजनेअंतर्गत 29.07.2024 पर्यंत 56,526 अर्जदारांना एकूण 551.80 कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आले असून योजनेच्या पत घटकांतर्गत देशभरात एकूण 15,878 अर्जदारांना 132.49 कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. एकूण 14.38 लाख यशस्वीरित्या नोंदणीकृत पात्र लाभार्थींपैकी 9,05,328 अर्जदारांनी विपणन विषयक सहाय्यासाठी निवड केली आहे.

परिशिष्ट I

S. No

State/UTs

Number of candidates certified under Basic Skill Training (as on 19th July, 2024)

  1.  

Andhra Pradesh                          

47,235

  1.  

Assam

28,169

  1.  

Bihar

3,966

  1.  

Chandigarh

33

  1.  

Chhattisgarh

14,621

  1.  

Daman and Diu and Dadra & Nagar Haveli

0

  1.  

Goa

2,464

  1.  

Gujarat

81,542

  1.  

Haryana

7,414

  1.  

Himachal Pradesh

1,261

  1.  

Jammu and Kashmir

82,514

  1.  

Jharkhand

8,722

  1.  

Karnataka

1,12,737

  1.  

Kerala

589

  1.  

Ladakh

1,032

  1.  

Madhya Pradesh

17,316

  1.  

Maharashtra

37,413

  1.  

Manipur

715

  1.  

Nagaland

227

  1.  

Odisha

6,922

  1.  

Punjab

1,560

  1.  

Rajasthan

25,166

  1.  

Telangana

12,832

  1.  

Tripura

3,685

  1.  

Uttar Pradesh

16,477

  1.  

Uttarakhand

3,223

 

Grand Total

5,17,835

 

परिशिष्ट II

State/UT

Number of Enrolments/ Applications Received

Number of Successful Registrations

Dadra and Nagar Haveli, Daman and Diu

6,338 

565 

Maharashtra

12,03,359    

1,11,861

 

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), जयंत चौधरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

JPS/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2041598) Visitor Counter : 70