उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांचे केले अभिनंदन

Posted On: 30 JUL 2024 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जुलै 2024

भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

उपराष्ट्रपतींनी एक्स पोस्टमध्ये,त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले असून त्यांच्या या यशातून देशातल्या तरुणांना प्रेरणा मिळेल असे म्हटले आहे.

एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवण्याच्या अद्वितीय कामगिरीचीही उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली आहे, जी कोणत्याही भारतीयाची ऑलिम्पिकमधली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

 

 

N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2039230) Visitor Counter : 36