गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

शहरी भागात सर्वांसाठी पक्की घरे

Posted On: 29 JUL 2024 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2024

जमीन आणि वसाहतीकरण हे राज्यांच्या अखत्यारितील विषय आहेत.म्हणूनच नागरिकांसाठी गृहनिर्माणाशी संबंधित योजनांची अंमलबजावणी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून केली जाते. मात्र, 25.6.2015 पासून गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय देशभरातील सर्व पात्र शहरी लाभार्थ्यांना मूलभूत सुविधांसह पक्की घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-शहरी(पीएमएवाय- यु) अंतर्गत, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याकरिता केंद्रीय अर्थसहाय्य देत आहे. पीएमएवाय-शहरी ही मागणी आधारित योजना आहे आणि भारत सरकारने घरांच्या बांधणीसाठी निश्चित लक्ष्य निर्धारित केलेले नाही. शहरी भागातील मागणीच्या आधारे, राज्ये/केंद्रशासित प्रदेश प्रकल्पांचे प्रस्ताव तयार करतात आणि राज्य स्तरीय मंजुरी आणि देखरेख समितीच्या मान्यतेनंतर हे प्रस्ताव केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीकडून मंजुरीयोग्य केंद्रीय सहाय्याच्या मंजुरीसाठी या मंत्रालयाकडे सादर केले जातात. भारत सरकार केंद्रीय साहाय्याचा निश्चित हिस्सा म्हणून आयएसएसआर अंतर्गत रु. 1.0 लाख प्रति घर, पीएमएवाय-यू च्या एएचपी म्हणजे भागीदारीमध्ये परवडणारी घरे  आणि बीएलसी म्हणजे लाभार्थी प्रणीत बांधकाम व्हर्टिकल्ससाठी रु. 1.5 लाख प्रति घर  देत आहे.

पीएमएवाय- यू अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 40%, 40% आणि 20% अशा तीन हप्त्यात केंद्रीय सहाय्य देण्यात आले आहे.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर आधारित, 15.07.2024 पर्यंत मंत्रालयाने पीएमएवाय- यू अंतर्गत एकूण 118.64 लाख घरे मंजूर केली आहेत. मंजूर घरांपैकी 114.33 लाख घरांचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले आहे; त्यापैकी 85.04 लाख पूर्ण/वितरित झाली आहेत. पीएमएवाय- यू अंतर्गत मंजूर केलेल्या आणि जारी केलेल्या केंद्रीय सहाय्यासह मंजूर केलेल्या, बांधकाम केलेल्या, पूर्ण झालेल्या/वितरित केलेल्या घरांच्या संख्येचा राज्य/केंद्रशासित प्रदेश-निहाय तपशील परिशिष्टात दिला आहे.

प्रकल्प पूर्ण करण्याची कालमर्यादा राज्यानुसार बदलते आणि साधारणपणे योजनेच्या वेगवेगळ्या व्हर्टिकल्समध्ये आणि संबंधित प्रकल्पांच्या डीपीआरनुसार 12 ते 36 महिने लागतात. घरे पूर्ण होण्याचा कालावधी विविध घटकांवर अवलंबून असतो. मालकी हक्क विवाद मुक्त जमिनीची उपलब्धता, बांधकाम सुरू करण्यासाठी वैधानिक अनुपालन, लाभार्थ्यांकडून निधीची व्यवस्था इ. घटकांचा त्यात समावेश असतो. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना मंजूर घरांच्या उभारणीला गती देण्याचा सल्ला देण्यात आला आहे जेणेकरून सर्व घरांचे बांधकाम निर्धारित कालमर्यादेत पूर्ण होऊ शकेल. या योजनेचा कालावधी यापूर्वी 31.03.2022 पर्यंत होता, या कालावधीत वाढ करून, पत संलग्न अनुदान योजना व्हर्टिकल वगळता,  तिला 31.12.2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, सर्व मंजूर घरे निधीपुरवठ्याचे स्वरुप किंवा अंमलबजावणीची पद्धत न बदलता पूर्ण करण्यात येतील.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

परिशिष्ट

पीएमएवाय-यू अंतर्गत आतापर्यत मंजूर आणि वितरित केंद्रीय साहाय्यासह मंजूर घरे, बांधकाम सुरू झालेली घरे आणि पूर्ण/वितरित झालेली घरे यांचे राज्य/ केंद्रशासित प्रदेश निहाय तपशील परिशिष्टात दिले आहेत.

Sr. No.

 

Name of the
State/ UT

Physical Progress of Houses (Nos)

Financial Progress in respect of Central Assistance (in Crore)

 

Sanctioned

Grounded

Completed/ Delivered

 

 Sanctioned

 Released

 

1

States

Andhra Pradesh

21,37,028

19,90,937

9,73,837

32,568.27

23,800.26

 

2

Bihar

3,14,477

3,05,811

1,47,979

4,950.45

3,368.00

 

3

Chhattisgarh

3,02,663

2,89,128

2,38,894

4,810.98

4,088.81

 

4

Goa

3,146

3,146

3,145

74.76

75.04

 

5

Gujarat

10,05,204

9,83,778

9,18,185

21,064.34

19,805.76

 

6

Haryana

1,15,034

93,153

68,114

2,171.64

1,673.50

 

7

Himachal Pradesh

12,758

12,668

10,705

215.95

202.02

 

8

Jharkhand

2,29,156

2,13,534

1,42,810

3,603.31

2,987.87

 

9

Karnataka

6,38,121

5,73,160

3,69,449

10,614.43

7,168.29

 

10

Kerala

1,67,322

1,47,721

1,23,453

2,781.18

2,293.45

 

11

Madhya Pradesh

9,61,147

9,49,265

8,01,068

15,930.45

15,284.69

 

12

Maharashtra

13,64,923

11,16,949

8,55,339

25,548.21

19,323.37

 

13

Odisha

2,03,380

1,80,647

1,47,148

3,176.98

2,479.75

 

14

Punjab

1,32,235

1,16,264

83,894

2,342.54

1,825.79

 

15

Rajasthan

3,19,863

2,64,357

1,91,971

5,891.46

4,693.97

 

16

Tamil Nadu

6,80,347

6,63,430

5,70,294

11,185.30

10,135.67

 

17

Telangana

2,50,084

2,44,219

2,24,659

4,475.66

3,718.27

 

18

Uttar Pradesh

17,76,823

17,33,051

15,47,101

27,962.68

26,065.17

 

19

Uttarakhand

64,391

60,160

34,504

1,176.51

940.86

 

20

West Bengal

6,68,953

6,12,998

4,00,257

10,773.50

7,675.93

 

Sub- total (States) :-

1,13,47,055

1,05,54,376

78,52,806

1,91,318.59

1,57,606.50

 

21

North East States

Arunachal Pradesh

8,499

8,070

7,753

182.38

161.18

 

22

Assam

1,76,643

1,60,473

1,02,712

2,674.26

2,065.73

 

23

Manipur

56,037

48,657

14,699

841.39

471.91

 

24

Meghalaya

4,758

3,793

1,632

72.35

43.31

 

25

Mizoram

39,605

39,215

11,069

607.80

447.22

 

26

Nagaland

31,860

31,841

22,850

503.91

393.41

 

27

Sikkim

316

316

202

6.13

7.09

 

28

Tripura

92,854

84,751

74,049

1,494.35

1,273.47

 

Sub- total (N.E. States) :-

4,10,572

3,77,116

2,34,966

6,382.57

4,863.31

 

29

Union Territories

A&N Island

376

376

47

5.84

2.93

 

30

Chandigarh

1,256

1,256

1,256

28.78

28.78

 

31

DNH & DD

9,947

9,947

9,230

214.40

200.27

 

32

Delhi

29,976

29,976

29,976

692.53

692.53

 

33

J&K

47,040

42,894

24,244

724.94

483.48

 

34

Ladakh

1,307

1,014

843

30.22

24.05

 

35

Lakshadweep

-

-

-

-

-

 

36

Puducherry

15,995

15,271

9,994

254.12

223.19

 

Sub- total (UT) :-

1,05,897

1,00,734

75,590

1,950.84

1,655.23

 

Grand Total  :-

118.64 Lakh

114.33 Lakh*

85.04 Lakh*

2.00 Lakh Cr.

1.64 Lakh Cr.

 

Includes completed (3.41 lakh)/ grounded (4.01 lakh) houses of JnNURM during mission period.


N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2038543) Visitor Counter : 40