पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी खासदार थिरू मास्टर माथन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
Posted On:
27 JUL 2024 10:51AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी खासदार थिरू मास्टर माथन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
थिरू मास्टर माथन, यांनी समाजसेवेसाठी केलेले अथक प्रयत्न आणि पददलितांसाठी केलेल्या कार्यासाठी ते सदैव स्मरणात राहतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"माजी खासदार थिरू मास्टर माथनजी यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. त्यांनी समाजसेवेसाठी केलेले अथक प्रयत्न आणि पददलितांसाठी केलेल्या कार्यासाठी ते सदैव स्मरणात राहतील. तामिळनाडूमध्ये आपल्या पक्षाला अधिक मजबूत करण्यात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले होते. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती."
***
H.Akude/B.Sontakke/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2037885)
अभ्यागत कक्ष : 117
Read this releasein:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam