गृह मंत्रालय
मातृभूमीचे अत्यंत शौर्याने संरक्षण करणाऱ्या धाडसी सैनिकांना ‘कारगिल विजय दिना’निमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी वाहिली आदरांजली
कारगिल विजय दिन हा लष्करातील धाडसी सैनिकांच्या शौर्याच्या अढळ निश्चयाचे प्रतीक आहे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
देशाच्या शूरवीर सैनिकांचे बलिदान, समर्पित वृत्ती आणि हौतात्म्य यांना हा कृतज्ञ देश कधीही विसरणार नाही
प्रविष्टि तिथि:
26 JUL 2024 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जुलै 2024
मातृभूमीचे अत्यंत शौर्याने संरक्षण करणाऱ्या धाडसी सैनिकांना ‘कारगिल विजय दिना’निमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज श्रद्धांजली वाहिली.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात, केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की कारगिल विजय दिन हा आपल्या लष्करातील धाडसी सैनिकांच्या शौर्याच्या अढळ निश्चयाचे प्रतीक आहे. कारगिलच्या युद्धात आपल्या शूर सैनिकांनी हिमालयाच्या दुर्गम टेकड्यांवर अतुलनीय धाडसाचे दर्शन घडवत शत्रूला गुडघे टेकायला लावले आणि कारगिलवर पुन्हा तिरंगा फडकावून संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी बजावली. अत्यंत धाडसाने मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांना ‘कारगिल विजय दिना’ निमित्त केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली. ते म्हणाले की देशाच्या शूरवीर सैनिकांचे बलिदान समर्पणवृत्ती आणि हौतात्म्य यांना हा कृतज्ञ देश कधीही विसरणार नाही.
कारगिल विजय दिवस सेना के वीर जवानों के शौर्य के अटूट संकल्प का प्रतीक है। कारगिल के युद्ध में वीर जवानों ने हिमालय की दुर्गम पहाड़ियों में पराक्रम की पराकाष्ठा का परिचय देते हुए दुश्मन की सेना को घुटने टेकने पर मजबूर किया और कारगिल में पुन: तिरंगा लहराकर देश को गौरवान्वित किया।… pic.twitter.com/X5dPILDqkU
— Amit Shah (@AmitShah) July 26, 2024
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2037594)
आगंतुक पटल : 81