अर्थ मंत्रालय
अल्पवयीनांसाठी 'वात्सल्य' ही नवीन पेन्शन योजना जाहीर; पालक आणि अभिभावकांचे ही योगदान
नवीन पेन्शन योजनेचे पुनरावलोकन करण्यासाठी समितीने केलेली लक्षणीय प्रगती: अर्थमंत्री
Posted On:
23 JUL 2024 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2024
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत आज सादर केला. त्यामध्ये अल्पवयीन मुलांसाठी ‘वात्सल्य’ नावाची नवीन पेन्शन योजना प्रस्तावित केली आहे.
ही एक योगदानाधारित पेन्शन योजना असून यात पालकांचे योगदान असेल. वयाची प्रौढता प्राप्त झाल्यावर, ही योजना सहजपणे सामान्य एनपीएस खात्यात रूपांतरित केली जाऊ शकते.
केंद्रीय मंत्र्यांनी व एनपीएसचा आढावा घेणाऱ्या समितीने त्यांच्या कामात बऱ्यापैकी प्रगती केल्याचेही जाहीर केले. त्यांनी राष्ट्रीय परिषदेच्या संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने रचनात्मक दृष्टिकोन समजून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर “सामान्य नागरिकांचे रक्षण करण्यासाठी वित्तीय शिस्त राखत संबंधित मुद्द्यांचे निराकरण करणारा एक उपाय याद्वारे शोधला जाईल”, असे अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले.
M.Iyengar/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2036127)
Visitor Counter : 129