अर्थ मंत्रालय
पंतप्रधान योजनांचा संच पॅकेजचा भाग म्हणून ‘रोजगार संलग्न प्रोत्साहन ’ साठी केंद्र सरकार 3 योजना राबवणार
Posted On:
23 JUL 2024 5:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2024
पंतप्रधान योजनांचा संच पॅकेजचा भाग म्हणून ‘रोजगार संलग्न प्रोत्साहन’साठी केंद्र सरकार 3 योजना राबवणार आहे. या योजना ईपीएफओमधील नावनोंदणीवर आधारित असतील तसेच प्रथमच रोजगार मिळणाऱ्यांना चिन्हांकित करणे आणि कर्मचारी आणि नियोक्त्यांना सहाय्य प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करेल. केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री यांनी निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर करताना ही घोषणा केली. राबविण्यात येणाऱ्या तीन योजना खालीलप्रमाणे आहेत.
योजना अ : प्रथमच नोकरी करणारे
केंद्रीय वित्तमंत्र्यांनी सांगितले की, या योजनेत सर्व औपचारिक क्षेत्रांमध्ये नव्याने रुजू होणाऱ्या सर्व व्यक्तींना एक महिन्याचे वेतन दिले जाईल. ईपीएफओ मध्ये नोंदणीकृत प्रथमच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला एका महिन्याच्या पगाराचे थेट लाभ हस्तांतरण 3 हप्त्यांमध्ये केले जाईल जे कमाल 15,000 रुपये पर्यंत असेल. यासाठी पात्रता मर्यादा 1 लाख रुपये मासिक वेतन असेल. या योजनेचा 210 लाख युवकांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे", असे त्या म्हणाल्या.
योजना ब: उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती
केंद्रीय वित्तमंत्री म्हणाल्या की, या योजनेत उत्पादन क्षेत्रात अतिरिक्त रोजगारांना प्रोत्साहन दिले जाईल आणि ते प्रथमच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराशी निगडीत आहे. रोजगाराच्या पहिल्या 4 वर्षांमध्ये कर्मचारी आणि नियोक्ता यांना त्यांच्या ईपीएफओ योगदानासंदर्भात विशिष्ट प्रमाणात प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेचा लाभ प्रथमच रोजगार मिळालेल्या 30 लाख तरुणांना आणि त्यांच्या नियोक्त्याला मिळेल अशी आशा निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली.
योजना क : नियोक्त्यांना सहाय्य
ही नियोक्ता-केंद्रित योजना असून सर्व क्षेत्रातील अतिरिक्त रोजगार समाविष्ट करेल, असे केंद्रीय वित्तमंत्र्यांनी सांगितले. मासिक 1 लाख रुपये वेतनाच्या आतील सर्व अतिरिक्त रोजगारांची यात गणना केली जाईल. सरकार प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी नियोक्त्यांना त्यांच्या ईपीएफओ योगदानासाठी 2 वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपये इतकी प्रतिपूर्ती करेल. "या योजनेमुळे 50 लाख लोकांना अतिरिक्त रोजगार प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे", असे त्यांनी सांगितले.
H.Akude/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2036000)
Visitor Counter : 124
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam