पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या जयंतीनिनिमित्त वाहिली आदरांजली.

Posted On: 23 JUL 2024 9:57AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या जयंतीनिनिमित्त अभिवादन केले आहे. गेल्या वर्षी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांनी त्यावेळी केलेले भाषण देखील सामायिक केले आहे.

पंतप्रधानांनी एक्स पोस्टवर म्हटलं आहे,

"लोकमान्य टिळक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. राष्ट्रभक्तीची ज्योत कायम तेवत ठेवण्यासाठी अथक परिश्रम करत असताना त्याचवेळी शिक्षण आणि सेवा या दोन्ही घटकांवर भर देणारे ते एक दूरदर्शी होते. गेल्या वर्षी पुणे येथे मला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी मी केलेले भाषण येथे सामायिक करत आहे."

***

JPS/BS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2035533) Visitor Counter : 22