कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या वारशाविषयीच्या पुस्तकाचे प्रकाशन
‘पॉवर विदिनः द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी’ हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या प्रवासाचा वेध घेत पाश्चिमात्य आणि भारतीय दृष्टीकोनातून लावत आहे अर्थ
Posted On:
21 JUL 2024 5:03PM by PIB Mumbai
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना आज प्रसिद्ध विचारवंत, लेखक, अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाचे माजी ऱ्होड्स प्राध्यापक, सध्या भारत सरकारच्या क्षमता उभारणी आयोगातील मानव संसाधन सदस्य म्हणून कार्यरत असलेले डॉ. आर. बालसुब्रमण्यम् यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या वारशावरील आपले पुस्तक भेट दिले.
छायाचित्र: प्रसिद्ध विचारवंत डॉ. आर. बालसुब्रमण्यम्, सदस्य- एचआर क्षमता उभारणी आयोग, रविवारी नवी दिल्ली येथे त्यांचे नवीन पुस्तक केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना भेट देताना
‘पॉवर विदिनः द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी’ हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या प्रवासाचा आढावा घेत आहे आणि पाश्चिमात्य आणि भारतीय दृष्टीकोनातून अर्थ लावत आहे, ज्यांना सार्वजनिक सेवेत जीवन व्यतित करण्याची आकांक्षा आहे त्यांना या दोन्हीद्वारे एक मार्ग उपलब्ध करून देत आहे.
डॉ. आर. बालसुब्रमण्यम् यांनी यापूर्वी नऊ पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्यापैकी “व्हॉईसेस फ्रॉम द ग्रासरुट्स” आणि “लीडरशिप लेसन्स फॉर डेली लिव्हिंग” या पुस्तकांची जागतिक स्तरावर प्रशंसा झाली आहे.
‘पॉवर विदिनः द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी’ हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या पद्धतीने प्रेरित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून भारताच्या नागरी विद्वत्तेचा वेध घेणाऱ्या या पुस्तकात या नेतृत्वपद्धतीचे सिंहावलोकन केले आहे.
मोदी यांचे अथक कठोर परिश्रम आणि संवादात्मक दृष्टीकोनाने त्यांनी पंतप्रधानपदापर्यंत केलेल्या वाटचालीवर मंत्रिमंडळातील आणि मंत्रिमंडळाबाहेरील त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकाश टाकला आहे.
विद्वत्तेचे क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्र अशा क्षेत्रांसह जीवनाच्या विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्तिमत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत यांनी व्यक्त केलेली मते आणि रंजक किस्से यांचा देखील या पुस्तकात समावेश आहे.
खरोखरच या पुस्तकावर मोदी यांची आणि त्यांच्या काळातील घटनाक्रमाची छाप आहे आणि जागतिक स्तरावर भारताला मध्यवर्ती स्थान मिळवून देण्याच्या मोदी यांच्या संकल्पाला हे पुस्तक अधोरेखित करत आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात भारतीय नेतृत्वाच्या विविध स्वरुपांचा अतिशय आद्य आणि सर्वाधिक प्रामाणिक दस्तावेज म्हणता येईल अशा प्रकारचे हे पुस्तक आहे, प्रत्यक्षात हे पुस्तक म्हणजे एक केस स्टडी आहे असे त्यांनी सांगितले आणि भविष्यातील संशोधकांना संदर्भासाठी एक उपयुक्त दस्तावेज ठरेल, असे भाकित वर्तवले.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
(Release ID: 2034810)
Visitor Counter : 105