आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
सायन्स ॲडव्हान्सेस मासिकामधील अभ्यासातून 2020 मधील अत्याधिक मृत्यूदरावर प्रकाश टाकणारा प्रसार माध्यमांचा अहवाल असमर्थनीय आणि अस्वीकार्य अंदाजावर आधारित
सायन्स ॲडव्हान्सेस मधील प्रबंधात 2020 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत जास्त मृत्यूची नोंद केली गेली
हा अभ्यास चुकीचा असून लेखकांनी अनुसरण केलेल्या पद्धतीमध्ये गंभीर त्रुटी; या अभ्यासातील दावे विसंगत आणि अस्पष्ट
सायन्स ॲडव्हान्सेस मधील प्रबंधात नोंदवलेल्या 2020 मधील भारतातील सर्व कारणास्तव झालेल्या मृत्यूचा दर मागील वर्षाच्या तुलनेत 11.9 लाख मृत्यूंपेक्षा कमी
अभ्यासाचे निष्कर्ष आणि स्थापित कोविड-19 मृत्यूचे नमुने यांच्यातील तफावत अभ्यासाची विश्वासार्हता आणखीच कमी करते
हा अभ्यास भारताच्या मजबूत नागरी नोंदणी प्रणालीचे (CRS) सत्य स्विकारण्यात अयशस्वी ठरला, ज्याने 2020 मध्ये मृत्यू नोंदणीमध्ये (99% पेक्षा जास्त) लक्षणीय वाढ नोंदवली, ज्यासाठी केवळ साथीच्या रोगाला कारणीभूत ठरवता येणार नाही
प्रविष्टि तिथि:
20 JUL 2024 12:14PM by PIB Mumbai
भारतात 2020 मध्ये कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान आयुर्मानावरील सायन्स ॲडव्हान्सेस या शैक्षणिक मासिकामध्ये आज प्रकाशित झालेल्या शोधपत्रातील निष्कर्ष काही प्रसार माध्यम अहवालांनी अधोरेखित केले आहेत. हे निष्कर्ष असमर्थनीय आणि अस्वीकार्य अंदाजांवर आधारित आहेत.
हे विश्लेषण करण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 (NFHS-5) च्या मानक पद्धती पाळल्याचा लेखक दावा करत असला तरीही या अभ्यासाच्या कार्यपद्धतीमध्ये गंभीर त्रुटी आहेत. सर्वात महत्त्वाची त्रुटी म्हणजे लेखकांनी जानेवारी ते एप्रिल 2021 दरम्यान राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या कुटुंबांचा एक उपसंच घेतला आहे आणि त्याची 2020 मधील कुटुंबांमधील मृत्यूची 2019 शी तुलना केली आहे, आणि त्याचा परिणाम संपूर्ण देशासाठी विस्तारित केला आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण नमुना हा देशाचा प्रातिनिधिक मानला असेल तरच त्याचा संपूर्ण विचार केला जातो. या विश्लेषणामध्ये 14 राज्यांतील 23% कुटुंबांना देशाचे प्रतिनिधी मानले जाऊ शकत नाही. या शिवाय दुसरी गंभीर त्रुटी समाविष्ट केलेल्या नमुन्यातील संभाव्य निवड आणि अहवाल पूर्वाग्रहांशी संबंधित आहे; कारण हा डेटा कोविड-19 महामारी भरात असताना संकलित करण्यात आला होता.
भारतासह कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये महत्त्वाची नोंदणी प्रणाली कमकुवत असल्याचा दावा करून अशा विश्लेषणांच्या गरजेसाठी हा प्रबंध चुकीच्या मार्गाने युक्तिवाद करतो आहे. हे सत्यापासून खुपच दूर आहे. भारतातील नागरी नोंदणी प्रणाली (CRS) अत्यंत मजबूत आहे आणि 99% पेक्षा जास्त मृत्यू याद्वारे नोंदले जातात. हा अहवालातील दर 2015 मधील 75% वरून 2020 मध्ये 99% पेक्षा अधिक वाढला आहे. या प्रणालीतील माहिती 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये मृत्यू नोंदणीमध्ये 4.74 लाखांनी वाढ झाल्याचे दर्शविते. संबंधित मागील वर्षांपेक्षा 2018 आणि 2019 मध्ये मृत्यू नोंदणीत अनुक्रमे 4.86 लाख आणि 6.90 लाख इतकीच वाढ झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, नागरी नोंदणी प्रणाली मधील एका वर्षातील सर्व अतिरिक्त मृत्यू हे साथीच्या आजारामुळे झालेले नाहीत. नागरी नोंदणी प्रणालीमध्ये मृत्यू नोंदणीचा वाढता कल (2019 मध्ये 92% होता) आणि त्यानंतरच्या वर्षात मोठ्या लोकसंख्येमुळे देखील जास्त आहे.
सायन्स ॲडव्हान्सेस पेपरमध्ये 2020 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 11.9 लाख मृत्यूंची नोंद झाली आहे, असे ठामपणे प्रतिपादित केले गेले आहे. साथीच्या आजारादरम्यान जास्त मृत्यू म्हणजे सर्व कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ, कोविड-19 मुळे थेट झालेल्या मृत्यूशी त्याची बरोबरी करता येणार नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
संशोधकांनी प्रकाशित केलेल्या या अंदाजांचे चुकीचे स्वरूप, भारताच्या नमुना नोंदणी प्रणाली (SRS) च्या माहितीतूनही स्पष्ट होते. नमुना नोंदणी प्रणाली देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या 8842 नमुना युनिटमधील 24 लाख कुटुंबांमधील सुमारे 84 लाख लोकसंख्येचा समावेश करते. 2018 आणि 2019 साठी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण विश्लेषणे आणि नमुना नोंदणी सर्वेक्षण विश्लेषणे यांचे परिणाम तुलनात्मक आहेत हे दाखवण्यासाठी लेखकाने खूप कष्ट घेत असले तरी, 2020 मधील नमुना नोंदणी प्रणाली डेटा 2019 डेटाच्या तुलनेत फारच कमी, जर असेल तर, जास्त मृत्यू आणि आयुर्मानात कोणतीही घट नाही असा अहवाल देण्यास ते पूर्णपणे अयशस्वी ठरतात. ( 2020 मध्ये कच्चा मृत्यू दर 6.0/1000, 2019 मध्ये कच्चा मृत्यू दर 6.0/1000)
या अभ्यासामध्ये वय आणि लिंग वरील परिणामांचा अहवाल देखील सादर करण्यात आला आहे, जो भारतातील कोविड-19 वरील संशोधन आणि कार्यक्रम डेटाच्या विपरीत आहे. स्त्रिया आणि लहान वयोगटांमध्ये (विशेषत: 0-19 वर्षे वयोगटातील मुले) अतिरिक्त मृत्युदर जास्त होता, असा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे. कोविड-19 मुळे सुमारे 5.3 लाख मृत्यूची नोंद झाली आहे, तसेच समूह आणि नोंदणींकडील संशोधन डेटा सातत्याने स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये (2:1) आणि वृद्ध वयोगटांमध्ये ( 60 वर्षे वयोगटात 0-15 वयोगटातील मुलांपेक्षा कित्येक पट जास्त ) कोविड-19 मुळे जास्त मृत्यू दर्शवतो. प्रकाशित अभ्यासातील हे विसंगत आणि स्पष्ट न करता येणारे परिणाम त्यांच्या दाव्यांची विश्वासार्हता कमी करतात.
शेवटी, भारतात 2020 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सर्व कारणास्तव जादा मृत्यू हा सायन्स ऍडव्हान्सेस अभ्यासामध्ये नोंदवलेल्या 11.9 लाख मृत्यूंपेक्षा स्पष्टपणे कमी आहे. आज प्रकाशित झालेला अभ्यास सदोष पद्धतीनुसार झालेला असून त्यातील निरीक्षणे अक्षम्य आणि अस्वीकार्य आहेत.
***
S.Pophale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2034598)
आगंतुक पटल : 148