खाण मंत्रालय

खाण मंत्रालयाद्वारे उद्या हैदराबादमध्ये खनिज उत्खनन हॅकेथॉन आणि महत्वपूर्ण मिनरल रोड शो चे आयोजन

Posted On: 19 JUL 2024 10:35AM by PIB Mumbai

हैदराबादमधील बेगमपेट येथे उद्या, 20 जुलै, 2024 रोजी खाण मंत्रालयाद्वारे खनिज उत्खनन हॅकेथॉन आणि महत्वपूर्ण मिनरल रोड शो आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी उपस्थित राहणार आहेत.
खनिज उत्खनन हॅकेथॉन नवोन्मेषी खनिज शोध तंत्रावर केंद्रित असेल.  जागतिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून खनिज अंदाज विकसित करणे  हा  या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमात सहभागी होणारे प्रतिनिधी भूभौतिकीय माहितीचे स्पष्टीकरण आणि मॉडेलिंग, बहुविध डेटा संचांचे एकत्रीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तसेच मशीन लर्निंग (ML) सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करतील.

या कार्यक्रमात जी किशन रेड्डी राष्ट्रीय जिल्हा खनिज  फाउंडेशन पोर्टलचा देखील प्रारंभ करतील.  देशभरातील जिल्हा खनिज प्रतिष्ठानांची माहिती एकत्रित करण्यासाठी हे पोर्टल केंद्रीकृत व्यासपीठ असेल.  नॅशनल डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन हे पोर्टल माहिती उपलब्धता सुलभ करेल आणि त्याखालील घडामोडी आणि उपयोगाचा मागोवा घेईल.
या कार्यक्रमानंतर महत्वपूर्ण आणि धोरणात्मक  खनिज खाणींच्या  ई-लिलावाच्या चौथ्या टप्प्यासंबंधी  रोड शो होईल. या रोड शोचा उद्देश उद्योगांचा सहभाग वाढवणे आणि संभाव्य बोलीदारांना खाण मंत्रालयाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ई-लिलावाच्या प्रक्रियेचा परिचय करून देणे हा आहे.

***

SushamaK/SMukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2034228) Visitor Counter : 20