पंतप्रधान कार्यालय

भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 2022 च्या तुकडीतील सहायक सचिव म्हणून नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद


सामाजिक न्याय साधणाऱ्या आणि भेदभाव रोखणाऱ्या दृष्टिकोनाने काम करण्याचे पंतप्रधानांचे सर्व अधिकाऱ्यांना आवाहन

सेवा देताना गतीरोधक व्हायचे की द्रुतगती महामार्ग हा तुमचा निर्णय आहे : पंतप्रधान

अधिकाऱ्यांचे काम प्रेरणादायी असले पाहिजे आणि डोळ्यांसमोर बदल होताना पाहून त्यांना समाधान वाटले पाहिजे

देश सर्वप्रथम हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे आणि या वाटचालीत सर्व अधिकाऱ्यांनी सामील व्हावे असे पंतप्रधानांनी केले आवाहन

सर्व श्रेणीतील तरुण अधिकाऱ्यांना अनुभवात्मक शिक्षणाची संधी देणे हा सहाय्यक सचिव पाठ्यक्रमामागचा हेतू : पंतप्रधान

Posted On: 11 JUL 2024 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सहायक सचिव म्हणून नियुक्ती झालेल्या 181 अधिकाऱ्यांशी संवाद साधला. अधिकारी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 2022 च्या तुकडीचे अधिकारी आहेत.

या संवादादरम्यान विविध अधिकाऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. तर या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले तेव्हा त्यांच्याशी केलेल्या संवादाची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. प्रशासकीय उतरंडीत वरपासून खालपर्यंतच्या सर्व श्रेणीतील तरुण अधिकाऱ्यांना अनुभव आधारित शिक्षणाची संधी प्रदान करणे हा सहाय्यक सचिव अभ्यासक्रमामागचा हेतू असतो असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, नवीन भारत उदासीन  दृष्टिकोनावर समाधानी राहणारा भारत नाही आणि अधिक सक्रियतेची  मागणी हा नवीन भारत करतोय. त्यांनी पुढे सांगितले की, सर्व नागरिकांना सर्वोत्तम शक्य प्रशासन, उत्पादनाची गुणवत्ता आणि चांगले जीवनमान प्रदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लखपती दीदी, ड्रोन दीदी, पीएम आवास योजना इत्यादी योजनांविषयी बोलताना, त्यांनी सांगितले की, या सर्व योजनांना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संपृक्त  दृष्टिकोनाने काम करायला हवे. हा  दृष्टिकोन सामाजिक न्याय सुनिश्चित करतो आणि भेदभाव टाळतो असे त्यांनी सांगितले. आता हे अधिकाऱ्यांच्या निवडीवर आहे की ते सेवा वितरणामध्ये वेग कमी करणारे गतिरोधक बनतील की ते एक वेगवान महामार्ग बनतील. त्यांनी पुढे सांगितले की, अधिकाऱ्यांनी उत्प्रेरक एजंट होण्याची इच्छा बाळगली पाहिजे जेणेकरून जेव्हा त्यांच्या समोर बदल होताना दिसेल तेव्हाच त्यांना समाधान मिळेल.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, 'राष्ट्र प्रथम' हे फक्त एक घोषवाक्य नाही तर आपल्या जीवनाचे ध्येय आहे असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या सोबत या प्रवासात चालण्याचे आवाहन केले.आयएएस म्हणून निवड झाल्यानंतर मिळालेली प्रशंसा या भूतकाळातील गोष्टी असून भूतकाळात न राहता त्यांनी भविष्याकडे वाटचाल करावी, असेही ते म्हणाले.

या संवादादरम्यान केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गौबा आणि गृह आणि डीओपीटी सचिव ए.के.भल्ला आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

N.Chitale/P.Jambhekar/G.Deoda/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2032587) Visitor Counter : 27