राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ड्युरंड चषक स्पर्धेच्या चषकांचे केले अनावरण
Posted On:
10 JUL 2024 5:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (10 जुलै 2024) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित कार्यक्रमात डुरंड चषक स्पर्धेच्या 2024 च्या चषकांचे अनावरण केले. अनावरण केलेल्या करंडकांमध्ये ड्युरंड चषक, राष्ट्रपती चषक आणि शिमला चषक यांचा समावेश आहे.
फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे, असे राष्ट्रपतींनी याप्रसंगी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले. व्यावसायिक फुटबॉलपटू जेव्हा हजारो चाहत्यांसमोर खेळतात तेव्हा खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्साह कैक पटींनी वाढतो, असेही त्या म्हणाल्या.
ड्युरंड चषक स्पर्धेत 2024 मध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपतींनी खेळाडूंना सांगितले की ते जिंकले किंवा हरले तरी काही फरक पडत नाही, पण, खेळामध्ये निरोगी स्पर्धा असली पाहिजे आणि खेळाडूंनी इतर संघांचा आदर केला पाहिजे. काहीवेळा खेळामध्ये भावनांचा आवेग असतो, परंतु खेळाडूंनी त्यांच्या भावनांना योग्यरित्या समायोजित करण्यासाठी आणि खेळात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. सर्व खेळाडू जिद्दीने आणि खिलाडू वृत्तीने खेळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतातील फुटबॉलचा स्तर उंचावण्यासाठी सर्व फुटबॉलप्रेमींनी प्रयत्न करावे असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2032150)
Visitor Counter : 178