राष्ट्रपती कार्यालय
भुवनेश्वर येथील राष्ट्रीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या 13 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती
Posted On:
09 JUL 2024 3:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (9 जुलै, 2024) ओदिशातील भुवनेश्वर येथे राष्ट्रीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या 13 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, मानवतेच्या उन्नतीसाठी आणि उत्थानासाठी उपयोगात आणले जाणारे शिक्षण हेच सार्थ शिक्षण असते. तुम्ही जिथे कुठे कार्यरत असाल, आपल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्टतेची पातळी गाठाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी बजावण्याबरोबरच आपली सामाजिक कर्तव्येही पूर्ण जबाबदारीने पार पाडाल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना नेहमी विनम्रता आणि अधिकाधिक जाणून घेण्याची भावना जपण्याची सूचना केली. त्या म्हणाल्या की, आपले ज्ञान सामाजिक उपक्रम आहे असे मानून त्याचा समाज आणि देशाच्या विकासासाठी उपयोग करा असे आवाहन त्यांनी केले. विज्ञानाच्या वरदानासोबतच त्याच्या अभिशापाचाही धोका नेहमीच असतो. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात खूप वेगाने बदल होत आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा विकास मानव समाजाला क्षमता प्रदान करत आहेत, मात्र त्याच वेळी मानवतेसाठी नवीन आव्हाने देखील निर्माण करत आहेत असे राष्ट्रपती म्हणाल्या . जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे, डिप फेक ची समस्या तसेच अनेक नियामक आव्हाने समोर येत आहेत.
मूलभूत विज्ञान क्षेत्रातील प्रयोग आणि संशोधनाचे परिणाम मिळण्यासाठी अनेकदा बराच वेळ लागतो. अनेक वर्षे निराशेचा सामना केल्यानंतर अनेक वेळा यश मिळाले आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. राष्ट्रपती विद्यार्थ्यांना म्हणाल्या की तुम्हालाही अनेकदा अशा टप्प्यातून जावे लागेल जेव्हा तुमच्या संयमाची परीक्षा घेतली जाईल. परंतु तुम्ही कधीही निराश होऊ नका. मूलभूत संशोधनातील विकासात्मक बाबी इतर क्षेत्रांमध्येही अत्यंत फायदेशीर ठरतात हे नेहमी लक्षात ठेवा असा सल्ला त्यांनी दिला.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2031718)
Visitor Counter : 51