गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी अमिन पीजेकेपी विद्यार्थी भवनाचे केले उद्घाटन, गुजरातच्या अहमदाबाद येथे आधुनिक बहुवैशिष्ट्यपूर्ण एसएलआयएमएस रुग्णालयाचेही केले उद्घाटन
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातच्या अहमदाबाद येथे अमिन पीजेकेपी विद्यार्थी भवनाचे उद्घाटन केले.
अमित शाह यांनी अहमदाबादमधील आधुनिक बहुवैशिष्ट्यपूर्ण एसएलआयएमएस रुग्णालयाचेही उद्घाटन केले.
त्याआधी, अमित शाह यांनी अहमदाबाद येथील श्री जगन्नाथ मंदिरात मंगल आरती केली.
प्रविष्टि तिथि:
07 JUL 2024 4:46PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्र्यांनी X समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे महाप्रभू जगन्नाथजींच्या रथयात्रेनिमित्त देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की "महाप्रभू जगन्नाथांची रथयात्रा हा भारतीय सांस्कृतिक वारसा आणि समृद्धीचे जतन करण्यासाठी आणि प्रगतीची नवीन शिखरे गाठण्यासाठी एक शुभ पर्वणी आहे, जी देशातील कोट्यवधी भाविक अत्यंत भक्तिभावाने साजरी करत असतात. ही यात्रा भारतीय संस्कृती स्वभावतःच चैतन्यशील असल्याचे प्रतीक असून उत्सव आणि अध्यात्म हे त्याचे वैशिष्ट्य आहे. सर्व देशवासियांना आपण महाप्रभूंच्या रथयात्रेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि महाप्रभू जगन्नाथ, वीर बलभद्र आणि माता सुभद्रा यांच्याकडे सर्वांच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करतो.”


***
S.Kane/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2031433)
आगंतुक पटल : 125