पंतप्रधान कार्यालय

भारतीय पंतप्रधानांच्या आगामी भेटीबाबत ऑस्ट्रियाच्या चान्सलरांकडून स्वागत संदेश, पंतप्रधान मोदी यांनीही दिला प्रतिसाद

Posted On: 07 JUL 2024 8:57AM by PIB Mumbai

 

भारतीय पंतप्रधानांच्या गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच होत असलेल्या ऑस्ट्रियाच्या आगामी भेटीबाबत ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहम्मर यांनी व्यक्त केलेल्या मतांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.

भारतीय पंतप्रधान गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच इथे भेट देत असल्याने ही भेट आमच्यासाठी विशेष सन्मान असून भारतासोबत 75 वर्षांचे राजनैतिक संबंध साजरे करत असल्याने ही भेट बहुमुल्य असा मैलाचा दगड ठरेलअसे ऑस्ट्रियाच्या चान्सलरनी म्हटले आहे.

या ऐतिहासिक प्रसंगी आपण हे संबंध आणखी दृढ करण्याबाबत चर्चा करणार असून सहकार्याच्या नवीन मार्गांना गवसणी घालण्यासाठी आपण उत्सुक असल्याची प्रतिक्रिया मोदी यांनी दिली आहे. 

मोदी x च्या माध्यमातून चान्सलर कार्ल नेहम्मर यांना प्रतिसाद देताना म्हणाले की:-

कुलपती @कार्ल नेहम्मर, आपले आभार. या या ऐतिहासिक प्रसंगी ऑस्ट्रियाला भेट देणे हे खरोखरच सन्मानजनक आहे. आपल्या देशांमधील  संबंध आणखी दृढ करण्याबाबत आपण चर्चा करणार असून सहकार्याच्या नवीन मार्गांना गवसणी घालण्यासाठी आपण उत्सुक आहोत. लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यांची सामायिक मुल्ये मजबूत पायाची निर्मिती करतात ज्यायोगे आपण आणखी निकटतम भागीदारीची बांधणी करू.

***

H.Akude/S.Naik/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031367) Visitor Counter : 30