संसदीय कामकाज मंत्रालय
येत्या 22 जुलै 2024 ते 12 ऑगस्ट 2024 या कालावधीत होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
प्रविष्टि तिथि:
06 JUL 2024 8:15PM by PIB Mumbai
संसदेचे 2024 या वर्षासाठीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 22 जुलै 2024 ते 12 ऑगस्ट 2024 या कालावधीत होणार आहे. संसदीय कामकाजाच्या आवश्यकतेच्या अधीन राहून हे अधिवेशन बोलवावे असा शिफारस प्रस्ताव केंद्र सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.
या अधिवेशनाच्या नियोजित कार्यक्रमानुसार येत्या 23 जुलै 2024 रोजी लोकसभेत 2024 - 25 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्स या समाजमाध्यमावर (पूर्वीचे ट्विटर) संदेश लिहून ही माहिती दिली आहे.
***
S.Patil/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2031332)
आगंतुक पटल : 223