सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
इंग्लंड विरूद्धच्या आंतरराष्ट्रीय कर्णबधिर क्रिकेट मालिकेतील भारतीय क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते भारतीय संघाचा सत्कार
प्रविष्टि तिथि:
03 JUL 2024 5:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2024
भारतीय कर्णबधीर क्रिकेट संघाने, इंग्लंडविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय कर्णबधिर क्रिकेट मालिकेत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा सत्कार केला. इंग्लंडमध्ये 18 ते 27 जून 2024 या कालावधीत झालेल्या टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाने 5-2 असा विजय मिळवून मालिका जिंकली.

सत्कार समारंभात डॉ. कुमार यांनी संघातील सदस्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मानित केले आणि त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा देशाला अभिमान असल्याचे सांगितले. "भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाचा हा विजय संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण असून, संघाच्या निर्धाराने अशक्य गोष्टीला शक्य केले आहे. हा विजय केवळ तुमचा नसून, संपूर्ण देशाचा आहे,” असे डॉ. कुमार म्हणाले.

डॉ. वीरेंद्र कुमार पुढे म्हणाले, "आमच्या कर्णबधिर खेळाडूंनी हे सिद्ध केले आहे की संधी मिळाल्यावर ते नेहमीच पुढे जाऊ शकतात. परदेशी भूमीवर तिरंगा फडकवणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. क्रिकेटच्या मैदानावरील विजयामुळे खेळाडूच्या जीवनात ऊर्जा, उत्साह आणि आनंद निर्माण होतो, त्यांना सर्वात कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा मिळते."

आपल्या भाषणाचा समारोप करताना डॉ. कुमार म्हणाले, "भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाचे यश कर्णबधिर खेळाडूंच्या जीवनात आशा आणि प्रेरणा निर्माण करेल, त्यांना पुढे जाण्यासाठी आणि अधिकाधिक उंची गाठण्यासाठी प्रोत्साहन देईल."
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2030466)
आगंतुक पटल : 99