कोळसा मंत्रालय
जून 2024 मध्ये देशातील कोळसा उत्पादनामध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत लक्षणीय वाढ
Posted On:
02 JUL 2024 4:05PM by PIB Mumbai
जून 2024 मध्ये भारताचे कोळसा उत्पादन 84.63 मेट्रिक टन (तात्पुरती आकडेवारी) इतके राहिले असून, मागील वर्षातील याच कालावधीच्या 73.92 मेट्रिक टन उत्पादनाच्या तुलनेत यामध्ये 14.49% इतकी वाढ झाली आहे. जून 2024 मध्ये, कोल इंडिया लिमिटेडने (CIL) 63.10 मेट्रिक टन (तात्पुरती आकडेवारी) कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट गाठले असून, ते मागील वर्षीच्या याच कालावधीच्या 57.96 मेट्रिक टन उत्पादनाच्या तुलनेत 8.87% इतकी वाढ दर्शवत आहे. याव्यतिरिक्त, जून 2024 मध्ये कंपन्यांच्या मालकीच्या/इतर खाणींमधील कोळसा उत्पादन 16.03 मेट्रिक टन (तात्पुरती आकडेवारी) इतके राहिले असून, ते मागील वर्षाच्या याच कालावधीतील 10.31 मेट्रिक टन उत्पादनाच्या तुलनेत 55.49% वाढ दर्शवत आहे.
जून 2024 मध्ये भारताची कोळसा पाठवणी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 77.86 मेट्रिक टनच्या तुलनेत 10.15% अधिक, म्हणजेच 85.76 मेट्रिक टन (तात्पुरती आकडेवारी) वर पोहोचली. जून 2024 मध्ये, CIL ने 64.10 मेट्रिक टन (तात्पुरती आकडेवारी) कोळसा पाठवला असून, मागील वर्षाच्या याच कालावधीतील 60.81 मेट्रिक टनच्या तुलनेत यामध्ये 5.41% वृद्धी दिसत आहे. याव्यतिरिक्त, जूनमध्ये कंपन्यांच्या मालकीच्या/अन्य खाणींची कोळसा पाठवणी 16.26 मेट्रिक टन (तात्पुरती आकडेवारी) इतकी राहिली असून, मागील वर्षाच्या 11.30 मेट्रिक टनच्या तुलनेत यामध्ये 43.84% वाढ दिसत आहे.
याव्यतिरिक्त, 30 जून 2024 रोजी, कोळसा कंपन्यांकडे असलेल्या कोळशाच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, तो 95.02 मेट्रिक टन (तात्पुरती आकडेवारी) वर पोहोचला.
ही वाढ 41.68 % इतका आकर्षक वार्षिक वृद्धी दर दर्शवत असून, कोळसा क्षेत्राची मजबूत कामगिरी आणि कार्यक्षमता अधोरेखित करत आहे.
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2030262)
Visitor Counter : 69