संरक्षण मंत्रालय
लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम) यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली
Posted On:
01 JUL 2024 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2024
लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी यांनी आज लष्कराचे उपप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली. लखनौ येथील सेंट्रल कमांडचे कमांडिंग इन चीफ या पदावर ते या नियुक्तीपूर्वी कार्यरत होते.
हे जनरल ऑफिसर डिसेंबर 1985मध्ये गढवाल रायफल्समध्ये सेवेसाठी रुजू झाले. प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि भारतातील मिलिटरी अकादमी या संस्थांमधून त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. ब्रिटनचे जॉइंट सर्विस कमांड स्टाफ कॉलेज आणि नवी दिल्लीचे नॅशनल डिफेन्स कॉलेजचे ते माजी विद्यार्थी आहेत. लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्स पदवी मिळवली आहे आणि मद्रास विद्यापीठातून डिफेन्स स्टडीजमध्ये एम फिल केले आहे.
आपल्या 37 वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीत त्यांनी संघर्षग्रस्त आणि दुर्गम भागात विविध प्रकारच्या पदावर काम केले आहे. अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षण नियुक्त्यासंदर्भातील पदांवर काम केले आहे.
त्यांना पश्चिम आणि उत्तरी सीमा या दोन्ही भागातील ऑपरेशनल डायनामिक्सची सखोल जाण आणि विस्तृत ज्ञान आहे.
त्यांच्या उल्लेखनीय देशसेवेबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2030081)
Visitor Counter : 100