पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ टीएनए नेते आर. संपान्थन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2024 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2024
ज्येष्ठ टीएनए नेते आर. संपान्थन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
मोदी म्हणाले की आर. संपान्थन यांनी श्रीलंकेतील तामिळ नागरिकांसाठी शांतता, सुरक्षितता, समानता, न्याय आणि प्रतिष्ठा असलेल्या जीवनाचा अथक पुरस्कार केला.
एका एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“ज्येष्ठ टीएनए नेते आर. संपान्थन यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत. त्यांच्या सोबत झालेल्या माझ्या भेटी कायम स्मरणात राहतील. श्रीलंकेतील तामिळ नागरिकांसाठी शांतता, सुरक्षितता, समानता, न्याय आणि प्रतिष्ठा असलेल्या जीवनाचा त्यांनी अथक पुरस्कार केला. श्रीलंका आणि भारतातील त्यांचे मित्र आणि अनुयायी यांच्या जीवनात त्यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.”
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2029999)
आगंतुक पटल : 114
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam