सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

29 जून 2024 रोजी "सांख्यिकी दिन" साजरा करणार


संकल्पना: निर्णय घेण्यासाठी माहितीचा वापर

Posted On: 28 JUN 2024 11:24AM by PIB Mumbai

सांख्यिकी आणि आर्थिक नियोजन क्षेत्रात प्राध्यापक (दिवंगत) प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन, भारत सरकारने दरवर्षी 29 जून हा दिवस त्यांच्या जयंती निमित्त "सांख्यिकी दिन" म्हणून राष्ट्रीय स्तरावर साजऱ्या केल्या जाणाऱ्या,विशेष श्रेणीतील दिवस म्हणून निश्चित केला आहे. देशाच्या विकासासाठी सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीमध्ये आकडेवारीची भूमिका आणि महत्त्व याविषयी, विशेष करून तरुण पिढीमध्ये त्याविषयी जनजागृती करणे,हा सांख्यिकी दिन साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे.

समकालीन विषयाचे राष्ट्रीय महत्त्व जाणून घेत, सांख्यिकी दिवस हा विशेष संकल्पनेद्वारे 2007 पासून  दरवर्षी साजरा केला जात आहे. सांख्यिकी दिनाची  2024 यावर्षीची संकल्पना,"निर्णय घेण्याकरिता माहितीचा वापर" ही आहे. डेटा-आधारित निर्णय घेण्याची संकल्पना ही कोणत्याही क्षेत्रातील  निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची आहे आणि अधिकृत आकडेवारीतून तयार होणारी सांख्यिकीय माहिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि पुराव्यावर आधारित निर्णय घेणे सुलभ करण्यासाठी ही एक पूर्व-आवश्यकता आहे.

सांख्यिकी दिन 2024 चा प्रमुख कार्यक्रम माणेकशॉ सेंटर, दिल्ली छावणी आणि नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ.अरविंद पनगडीया असून, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष (NSC) प्रा,राजीव लक्ष्मण करंदीकर, आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय,(MoSPI) सचिव डॉ.  सौरभ गर्ग, हे देखील कार्यक्रमातील सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत. या शिवाय,केंद्रीय मंत्रालये/विभाग, राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारचे वरिष्ठ अधिकारी, तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी उदा.जागतिक बँक, यूएनएजन्सी,आणि इतर हितसंबंधी देखील कार्यक्रमात सहभागी होतील. हा कार्यक्रम मंत्रालयाच्या सोशल मीडिया हँडलद्वारे प्रत्यक्ष प्रसारीत केला जाणार आहे.

यावेळी पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी घेतल्या गेलेल्या‘ऑन द स्पॉट निबंध लेखन स्पर्धा,2024’ च्या विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.

शाश्वत विकासाची उद्दिष्टे - या कार्यक्रमादरम्यान 2024 नॅशनल इंडिकेटर फ्रेमवर्क प्रोग्रेस अहवाल, देखील प्रकाशित करण्यात येणार आहे.या अहवालासोबत, शाश्वत विकास उद्दिष्टे- नॅशनल इंडिकेटर फ्रेमवर्क, 2024 आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स- नॅशनल इंडिकेटर फ्रेमवर्क, 2024 वरील डेटा स्नॅपशॉट देखील प्रसिद्ध केला जाईल.

अधिकृत आकडेवारीच्या प्रभावी आणि कार्यक्षम प्रसाराची गरज ओळखून,सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय,(MoSPI)अधिकृत आकडेवारीसाठी eSankhyiki नावाचे डेटा पोर्टल विकसित करण्यावर काम करत आहे, ज्यामध्ये महत्त्वाच्या सुक्ष्म निर्देशकांचा डेटा आणि मंत्रालयाच्या डेटा मालमत्तेची सूची दिलेली आहे.  या कार्यक्रमादरम्यान eSankhyiki पोर्टल आणि सेंट्रल डेटा रिपॉझिटरी यांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रादरम्यान, तज्ञ/वक्त्यांची संकल्पनेवर आधारीत संक्षिप्त सादरीकरणे/भाषणे होतील.

***

NM/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2029278) Visitor Counter : 80