गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी "आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन प्रतिबंधक आणि अवैध तस्करी विरोधी" दिनानिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा
अंमली पदार्थांविरुद्ध 'शून्य सहिष्णुता' धोरणांतर्गत अंमली पदार्थांच्या व्यसनाचे उच्चाटन करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिपादन
Posted On:
26 JUN 2024 8:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जून 2024
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी ‘आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन प्रतिबंधक आणि अवैध तस्करी विरोधी दिना’निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. एक्स या समाजमाध्यमावर सामायिक केलेल्या एका पोस्टमध्ये ते म्हणाले,“आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन प्रतिबंधक आणि अवैध तस्करी विरोधी दिनाच्या शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार भारताला अंमली पदार्थमुक्त देश बनवण्याच्या बांधिलकीवर ठाम आहे आणि सर्वसमावेशक सरकारी दृष्टिकोनाने हे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याचा आपला संकल्प आपण सर्वांनी दृढ करूया आणि आपल्या भावी पिढ्यांना एका चांगल्या विश्वाची भेट देऊया.”
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत ‘अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी’साठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केले.
अमित शाह यांनी आज 'आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन प्रतिबंधक आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त' जारी केलेल्या संदेशात, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचा 'अंमली पदार्थ मुक्त भारताचा' संकल्प पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या आपल्या संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आणि अखिल भारतीय 'अंमली पदार्थ मुक्त पंधरवडा' यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे कौतुक केले.
अंमली पदार्थ हे केवळ व्यक्तीसाठीच नव्हे तर समाज आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठीही आव्हान असल्याचे अमित शाह यांनी निदर्शनास आणून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘अंमली पदार्थ मुक्त भारत’ घडवणे हे आमच्या सरकारच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक असल्याचेही त्यांनी नमूद केले. मोदी सरकारने अंमली पदार्थांविरुद्धच्या लढाईत ‘उन्नत आणि अवनत दृष्टिकोनातून’ उत्तम समन्वयाचा अवलंब केला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
अंमली पदार्थ नियंत्रणावर सरकारने उचललेल्या सर्व सकारात्मक पावलांसह मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाची खातरजमा करून पूर्ण विजय मिळवणे हे आमचे ध्येय आहे असेही अमित शाह यांनी सांगितले. अंमली पदार्थांविरुद्धच्या सरकारच्या लढ्यात महत्त्वाचे योगदान देऊन आपण सर्वांनी एकत्रितपणे अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करून निरोगी, आनंदी आणि सुरक्षित समाज निर्माण करण्याची शपथ घेण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2028909)
Visitor Counter : 73