दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

दूरसंवाद सेवेच्या स्पेक्ट्रमच्या लिलावाला सरकारने आज सकाळी 10:00 वाजता केली सुरुवात


एकूण 10,522.35 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा 96,238.45 कोटी रुपये राखीव किमतीच्या विविध बँडचा होत आहे लिलाव

800 मेगाहर्ट्झ, 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, 2300 मेगाहर्ट्झ, 2500 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गिगाहर्ट्झचे स्पेक्ट्रम बँड लिलावासाठी उपलब्ध

Posted On: 25 JUN 2024 8:46AM by PIB Mumbai

दूरसंवाद सेवांमध्ये वाढ करण्यासाठी आणि सध्या अस्तित्वात असलेल्या सेवा सुरू ठेवण्यासाठी सरकार 25 जून 2024 रोजी सकाळी 10.00 वाजतापासून स्पेक्ट्रमचा लिलाव करत आहे. सर्व नागरिकांना परवडेल अशा दरात उच्च दर्जाच्या, अद्ययावत दूरसंवाद सेवांचा पुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून त्याच्या अंमलबजावणीसाठी हा लिलाव केला जात आहे.

दूरसंवाद विभागाने 8 मार्च 2024 रोजी अर्जांची मागणी करणारी नोटीस जारी करून या स्पेक्ट्रम लिलावाच्या प्रक्रियेला सुरुवात केली. 800 मेगाहर्ट्झ, 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, 2300 मेगाहर्ट्झ, 2500 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गिगाहर्ट्झच्या स्पेक्ट्रम बँडचा लिलाव होणार असल्याचे दूरसंवाद मंत्रालयाने जाहीर केले आहे.

एकूण 10,522.35 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा 96,238.45 कोटी रुपये राखीव किमतीच्या विविध बँडच्या स्वरुपात लिलाव होत आहे.

 

Band

Total Spectrum put to Auction (In MHz)

No of LSAs where Spectrum is sold

Value of Spectrum at Reserve Price (In Crs)

800 MHz

118.75

19

21341.25

900 MHz

117.2

22

15619.6

1800 MHz

221.4

22

21752.4

2100 MHz

125

15

11810

2300 MHz

60

6

4430

2500 MHz

70

5

2300

3300 MHz

1110

22

16251.2

26 GHz

8700

21

2734

Total

10,522.35

 

96,238.45

स्पेक्ट्रम लिलावाची वैशिष्ट्ये –

  • या लिलावात मेसर्स भारती एअरटेल लिमिटेड, मेसर्स वोडाफोन आयडिया लिमिटेड आणि मेसर्स रिलाअन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड या तीन कंपन्यांचा सहभाग आहे.
  • लिलावाची प्रक्रिया – हा ई-लिलाव समांतर बहुफेऱ्यांच्या चढत्या क्रमाने (सायमल्टॅनिअस मल्टिपल राउंड असेंडिंग – एस.एम.आर.ए.) होत आहे.
  • स्पेक्ट्रमचा कालावधी – स्पेक्ट्रम बँड 20 वर्षांच्या काळासाठी दिले जाणार आहेत.
  • किंमत देण्याबाबत – यशस्वी बोली लावणाऱ्या कंपनीला निव्वळ वर्तमान मूल्याचा 8.65% व्याज दर कायम ठेवून 20 समान वार्षिक भागांमध्ये किंमत भरण्याची मुभा आहे.
  • स्पेक्ट्रम परतीचा कालावधी – किमान 10 वर्षांनंतर लिलावांतर्गत घेतलेला स्पेक्ट्रम परत देता येईल.
  • स्पेक्ट्रमच्या वापराचा दर – या लिलावांतर्गत घेतलेल्या स्पेक्ट्रमच्या वापरासाठी कोणताही दर आकारण्यात येणार नाही.
  • बँकेची हमी – यशस्वी बोली लावणाऱ्या कंपनीने बँकेकडून आर्थिक हमी आणि कामगिरीची हमी देण्याची आवश्यकता नाही.

लिलावात सहभागी होणाऱ्यांना ई-लिलाव माध्यमाची ओळख आणि सराव व्हावा यासाठी 3, 4 आणि 14 जून 2024 या दिवशी लिलावाची सराव सत्रे घेण्यात आली. बोली लावणाऱ्यांनी दिलेल्या माहितीची अचूकता तपासण्यासाठी 24 जून 2024 रोजी सकाळी 9:00 वाजता लिलाव यादी प्रकाशित करण्यात आली. प्रत्यक्ष लिलावाला 25 जून 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरुवात झाली आहे.

लिलावाबाबत अधिक सविस्तर माहिती जसे की राखीव किंमत, पात्रतापूर्व अटी, अस्सल रक्कम ठेव, लिलावाचे नियम आणि इतर अटीशर्ती तंत्रज्ञान विभागाच्या https://dot.gov.in/spectrum या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

***

NM/ReshmaJ/RBedekarDY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2028453) Visitor Counter : 40